loader image
[ays_poll id=7]

राज्यभरातील कर्मचारी आज रात्री पासून जाणार संपावर

Jan 3, 2023


महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार असून खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे.

तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे राज्यातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास, मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आज 03 जानेवारी 2023 रोजी मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. महावितरण कर्मचाऱ्यांकडून तीन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे.

महावितरणचे खासगीकरण करण्याच्या विरोधात ही संपाची हाक देण्यात आली आहे. गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसांनंतरही सुरु ठेऊ अशी भूमिका माहावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. महावितरणचे खासगीकरण केले जाणार आहे. अदानी कंपनीने समान वीज वितरणासाठी परवानगी मागितली आहे. तसेच यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकार अदानी समूहाला वीजवितरणाचा परवाना देण्याची शक्यता आहे.

अदानी कंपनीला कोणत्याही परिस्थितीत वीज वितरणाचा परवाना मिळू नये, ही या संपकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. या संपात राज्याताली 30 संघटना सहभागी होणार आहेत. दरम्यान या काळात वीजपुरवठा करण्याची जबाबदारी ही वरिष्ठ अधिकारी आणि सरकारची असाल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर यांची सलग सातव्या आंतरराष्ट्रीय...

read more
नांदगाव तालुक्यातील मंदार गणेश पेट्रोल पंप – उत्कृष्ठ सेवे बद्दल जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने प्रमाणित

नांदगाव तालुक्यातील मंदार गणेश पेट्रोल पंप – उत्कृष्ठ सेवे बद्दल जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने प्रमाणित

नांदगाव : मारुती जगधने हिदुंस्तान पेट्रोलियम कंपनी लिमिटेडच्या वतीने क्लब एच पी यांच्या वतीने...

read more
लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) यांच्यातर्फे मतदान जनजागृती अभियानासंदर्भात बैठक संपन्न

लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) यांच्यातर्फे मतदान जनजागृती अभियानासंदर्भात बैठक संपन्न

मनमाड - मनमाड येथील लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) तर्फे लोकसभा...

read more
.