loader image
[ays_poll id=7]

मनमाड मुंबई स्पेशल गाडीला ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ ; मात्र गुरुवारी धावणार नाही

Jan 5, 2023

मनमाड :- मनमाड शहरातील चाकर मान्यांची सोयीची गाडी गोदावरी एक्सप्रेस च्या वेळी सुरू केलेली पर्यायी विशेष गाडीला ३१ मार्च पर्यंत मुदत वाढ दिली आहे मात्र ही गाडी गुरुवारी धावणार नाही. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ऐवजी दादरपर्यंतच धावणार आहे.त्यामुळे पुन्हा मनमाड, नाशिक हुन थेट सीएसएमटी ला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने दादर बलिया – दादर, दादर – • गोरखपुर -दादर, मनमाड – दादर दादर- मनमाड और लो. तिलक ट. – बल्लारशाह – लो. तिलक ट. या विशेष ट्रेनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा तपशिल खाली दिलेल्यानुसारः १) ट्रेन क्रमांक ०१०२५ व ००१०२६ दादर – बलिया – दादर विशेष ट्रेन २ जानेवारी ते १ मार्चपर्यंत २५ फे-यांसाठी वाढवण्यात आली आहे. ही ट्रेन आठवड्यातून तीन दिवस धावेल. २) ट्रेन क्रमांक ०१०२७ व ०१०२८ दादर गोरखपूर- दादर स्पेशल ट्रेन १ जानेवारी ते २ मार्च पर्यंत ३४ फेल्या करण्यात आली आहे. ही ट्रेन आठवड्यातून तीन दिवस धावेल. ३) ट्रेन क्रमांक ०२१०२ – मनमाड- दादर- मनमाड विशेष ट्रेन ६ जाने ते ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही ट्रेन गुरुवार वगळता आठवड्यातून ६ दिवस धावेल.

अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.