loader image
[ays_poll id=7]

एप्रिल अखेर पर्यंत बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश : जिल्ह्यातील १४ बजारसमितींच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

Jan 6, 2023

ज्या बाजार समित्यांच्या निवडणूका हाेणे बाकी आहे त्या बाजार समित्यांच्या निवडणूका ३० एप्रिलपर्यंत घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांच्या निवडणूकांचा मार्ग माेकळा झाला असून ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा बसताच आता बाजार समित्यांच्या निवडणुकिमुळे राजकीय वातावरण तापणार आहे.

जिल्ह्यात 17 बाजार समित्या असून सटाणा, उमराणा, नामपुर या तिन बाजार समित्या वगळता उर्वरीत बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम 15 मार्चपासून सुरू हाेण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, मतदार याद्यांचा कार्यक्रम देखील नव्याने जाहीर हाेण्याची शक्यता देखिल वर्तवली जात आहे.

ज्या बाजार समित्यांवर सध्या प्रशासक आहे, तेथे तेच कायम ठेवण्यात येणार असून ज्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली आहे किंवा संचालक मंडळ कार्यरत आहे तेथे प्रशासक नेमायचा किंवा कसे? याचे अधिकार सक्षम अधिकाऱ्याकडे म्हणजे, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे देण्यात आले आहेत. मतदार याद्यांबाबत अद्याप कुठल्याही स्वतंत्र मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या नसल्याचे कळते.जिल्ह्यातील चाैदा बाजार समित्यांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला हाेता, ताे जेथे थांबला हाेता तेथूनच सुरू केला जाताे का? पून्हा प्रारूप मतदार याद्यांचा कार्यक्रम नव्याने दिला जाताे हे पहाणे आता महत्वाचे ठरणार आहे. मात्र, 30 एप्रिलच्या आत निवडणूक घ्यायच्या असतील किमान 45 दिवस अगाेदर म्हणजे, 15 मार्चला निवडणूक कार्यक्रम लागू शकताे अशी दाट शक्यता देखिल वर्तवली जात आहे.

नाशिकसह पिंपळगाव बसवंत, लासलगाव, येवला, इगतपुरी, देवळा, चांदवड अशा माेठ्या बाजार समित्यांचा समावेश या चाैदा बाजार समित्यांमध्ये आहे. त्यांचा निवडणूक कार्यक्रम स्थगित झाला हाेता. आता या निर्णयामुळे मात्र निवडणूकांचा मार्ग माेकळा झाला असून ग्रामीण भागात पुन्हा एकदा निवडणूकीचा धुराळा उडणार आहे. गावपातळीपर्यंत या निवडणूकीच्या हालचाली पहायला मिळणार आहे.

अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.