loader image
[ays_poll id=7]

भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 19 संघाचा चाळीसगाव अंडर 19 संघावर विजय – कैलास सोनवणे सामनावीर तर रुषी शर्मा सर्वोत्कृष्ठ गोलंदाज.

Jan 7, 2023


शनिवारी भूमी क्रिकेट अकॅडमी मनमाड विरुध्द चाळीसगाव क्रिकेट अकॅडमी या संघामध्ये झालेल्या सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी संघाने 21 धावांनी विजय प्राप्त केला. 30 षटकांच्या या सामन्यामध्ये चाळीसगाव संघाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचे ठरवले. मनमाड संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 10 बळी गमवुन 118 धावा केल्या. यात सर्वाधिक धावा कैलास सोनवणे या डावखुऱ्या फलंदाजाने 18 चेंडूत 29 धावा फटकावल्या. खुशाल परळकर 66 चेंडुमध्ये 22 महत्वपुर्ण धावा संघासाठी जमवल्या. या धावांचा पाठलाग करत असताना चाळिसगाव संघ 19.1 षटकात सर्वबाद 97 धावाच करु शकला. फलंदाजीत 29 धावा 6 षटकांच्या गोलंदाजीत 34 धावा देऊन 03 बळी टिपणारा कैलास सोनवणे हा सामनावीर ठरला तसेच 5 षटकात 24 धावा देऊन 3 बळी टिपणारा रूषी शर्मा सर्वोत्कृष्ठ गोलंदाज ठरला. भुमी संघातील यशवर्धन बरवट व अध्ययन चव्हाण ह्या खेळाडुंनीही प्रत्येकी 2 बळी घेतले.

भूमी क्रिकेट अकॅडमी, मनमाड चे संचालक व कोच सिध्दार्थ ( भोला ) रोकडे व वाल्मिक रोकडे यांनी या सामन्याचे आयोजन चाळीसगाव येथे केले.

अकॅडमीचे चे मार्गदर्शक श्री. ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक , हबीब शेख , सिद्धार्थ बरडीया , परवेज शेख , कौशल शर्मा , तय्यब शेख , शुभम ( बापु ) गायकवाड , शुभम बिडगर रोहित पवार यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान भाई मोमीन यांनी खेळाडुंना पुढिल सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
.