loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद भाबड यांची निवड

Jan 10, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. या वेळी झालेल्या चुरशीच्या लढाईत नांदगाव चे आ.सुहास कांदे यांच्या नेतृत्वात आमदारांचे खंदे समर्थक प्रमोद भाबड यांची अध्यक्ष पदी निवड झाली.

जिल्हा मजूर संघाच्या संचालक पदासाठी गेल्या महिन्यात निवडणूक घेण्यात आली यावेळी २० जागांपैकी ८ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १२ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. आज दि. १० जानेवारी रोजी पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठी चुरस होती. यात प्रमोद भाबड यांना १२ मते तर इगतपुरी चे ज्ञानेश्वर लहाने यांना ८ मते मिळाल्याने प्रमोद भाबड यांची बहुमताने अध्यक्ष पदी निवड झाली. तसेच संघाच्या उपाध्यक्ष पदी सौ. शर्मिला कुशारे यांची निवड झाली.
यावेळी आ.सुहास कांदे, जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, विष्णू निकम, मा.नगराध्यक्ष राजेश कवडे, आनंद कासलीवाल, नागापुरचे सरपंच राजेंद्र पवार, योगेश पाटील, मालेगाव मर्चट बँक चेअरमन राजेंद्र भोसले,भाजपा जिल्हा अध्यक्ष केदा आहेर, साईनाथ गिडगे, तेजदादा कवडे, किशोर लहाने, किरण देवरे, मयुर बोरसे, अमोल नावंदर, डॉ. सांगळे, राजेंद्र देशमुख, संजय आहेर, अनिल रिंढे, दशरथ लहिरे, पंकज जाधव, जिल्हा मजूर संघाचे सर्व संचालक मंडळ तसेच उपस्थितांनी प्रमोद भाबड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.