loader image

माजी आमदार तथा इंटक चे नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन

Jan 11, 2023


नाशिक शहरातील राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रीय असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते निष्ठवान कार्यकर्ते माजी आमदार आणि इंटर्कचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश जितमल छाजेड यांचे काल उशिरा निधन झाले. ते 75 वर्षाचे होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. तरीदेखील नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी जाण्यासाठी निघाले होते. मात्र तब्येत व्यवस्थित नसल्याने त्यांनी जाण्यास टाळले. दरम्यान काल त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा लौकिक होता. युवक काँग्रेस पासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांनी पक्षातील शहर आणि प्रदेश पातळीवरील अनेक संघटनात्मक पदे भूषवली. तसेच तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. शिवाय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची गोल्फ क्लब मैदानावर छाजेड यांच्या पुढाकारातून सभा झाली होती.
दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ते जवळचे सहकारी होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना छाजेड यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाली होती. नाशिकचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवतील एक प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि नाशिकच्या माजी उपमहापौर शोभा छाजेड, मुलगा प्रितीश, हितेंद्र आणि आकाश असा परिवार आहे. दरम्यान आज नाशिकच्या काँग्रेस भवन त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी सहा वाजता नाशिक अमरधाम येथे अंत्यसंस्कार विधी पार पडणार आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.