loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी साजरी

Jan 11, 2023


के आर टी शाळेत लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे यांच्या हस्ते लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सातवी व इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर .विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते .इयत्ता सातवीच्या प्रांजल गांगुर्डे नंदिनी कणकुसे या विद्यार्थिनींनी लालबहादूर शास्त्री विषयी आपले मनोगत व्यक्त केले .इयत्ता दुसरीच्या वेदांत वाघ. सिद्धेश पितृभक्त या विद्यार्थ्यांनी लालबहादूर शास्त्री यांची वेशभूषा केली होती .या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लालबहादूर शास्त्री हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक व भारताचे दुसरे पंतप्रधान होते .लालबहादूर शास्त्री यांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात रुची निर्माण झाली. ब्रिटिश राजवटीचा विरोध करण्यासाठी स्थापित केलेल्या वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले. स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी अनेक मोहिमांचे नेतृत्व केले. आणि त्यांनी एकूण सात वर्ष ब्रिटिश तुरुंगवासात घालवली. लालबहादूर शास्त्री अतिशय नम्र होते .स्वातंत्र्यानंतर त्यांनी अनेक मंत्रिपदे सांभाळली .व ते देशाचे दुसरे पंतप्रधान झाले .त्यांच्या समर्पित सेवेदरम्यान ते जनमानसात निष्ठा व क्षमतेसाठी लोकप्रिय झाले. त्यांनी देशाला “जय जवान जय किसान” ही घोषवाक्य दिले. त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली देशाला विकासाच्या मार्गावर नेले. 10 जानेवारी 1966 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांनी देशासाठी केलेल्या अमूल्य कार्यासाठी त्यांना मरणोत्तर ं भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. असे म्हणत विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवनील जगताप यांनी केले. या विद्यार्थ्यांना सौ अनिता शाकादीपी. सौ सोनाली सरस्वती यांनी मार्गदर्शन केले.


अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
.