loader image
[ays_poll id=7]

स्वराज्य निर्मितीच्या जिजाऊ प्रेरणास्रोत – प्रा.डॉ.अरुण पाटील

Jan 12, 2023


मनमाड – दि.१२
राजमाता जिजाऊ यांच्या कार्याकडे जर बघितले तर राजे शिवछत्रपती यांच्या स्वराज्य निर्मितीसाठी जिजाऊ एक मुख्य प्रेरणास्त्रोत होता, एक स्त्री असूनही चार भिंतींच्या कुटुंबापलीकडे जाऊन अखंड स्वराज्य संस्थापणेची स्वप्न त्यांनी शिवबा जन्माला येण्याअगोदरच पाहिली होती, पुढील काळात शिव छत्रपतीनी ती पूर्ण केली, आणि महाराष्ट्रमुघलांच्या जुलमी सत्तेतून मुक्त झाला असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी केले.
महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला,वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालय मनमाड येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी या दोन्ही महान विभूतींना अभिवादन करताना प्राचार्य डॉ.पाटील बोलत होते. यावेळी उप प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर, कुलसचिव समाधान केदारे, आदी उपस्थित होते.पाटील पुढे म्हणाले की, मोठी माणसे ही जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर मोठीच असतात. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाकडे बघताना त्यांच्याकडून अनेक प्रेरणा आपल्याला मिळतात. त्यांच्या अनेक पुस्तकांचा दाखला यावेळी डॉ. पाटील यांनी दिला.महापुरुष हे केवळ एका काळाचे प्रतिनिधित्व करत नसतात तर कोणत्याही काळासोबत त्यांचे विचार प्रेरणादायी ठरतात, असे सांगून त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्य कर्तृत्ववावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ढमाले यांनी केले. प्राचार्य डॉ.पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रिताच्या T20 स्पर्धेसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड करण्यात आली.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रिताच्या T20 स्पर्धेसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड करण्यात आली.

  नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघाची निवड चाचणीत विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातुन...

read more
महाबँक आर-सेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण सस्थेतर्फे मोफत 6 दिवसाचे उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराचा निरोप समारंभ 

महाबँक आर-सेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण सस्थेतर्फे मोफत 6 दिवसाचे उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराचा निरोप समारंभ 

८  मार्च महिला दिनानिमित्त ओढा ता- नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे...

read more
नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे महाशिवात्रीनिमित्त श्री बाणेश्वराची यात्रा बाणगाव देवस्थान प्रती दक्षीण काशी

नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे महाशिवात्रीनिमित्त श्री बाणेश्वराची यात्रा बाणगाव देवस्थान प्रती दक्षीण काशी

नांदगाव सोमनाथ घोंगाणे श्रीराम अवतारामध्ये मारीच नावाच्या राक्षसाच्या मागे प्रभु श्रीराम शिकारसाठी...

read more
.