loader image
[ays_poll id=7]

अब्राहम लिंकन यांचे पत्र मुख्याध्यापक व प्राचार्य यांना देत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा

Jan 13, 2023

मराठा विद्या प्रसारक समाजाचे नांदगांव तालुका संचालक मा. इजि. अमीतभाऊ बोरसे पाटील यांचा दिनांक 11 जानेवारी रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून मराठा विद्या प्रसारक समाजाच्या मनमाड कॅम्पस मध्ये रक्तदान शिबिर, आनंद मेळा (खाद्यपदार्थाचे स्टॉल) चे आयोजन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे उद्धाटन मा. अमितभाऊ बोरसे यांच्या हस्ते झाले. सर्वांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. मात्र या दिवसाचे औचित्य साधत मा. अमितभाऊ बोरसे यांनी जगप्रसिद्ध असलेले अब्राहम लिंकन यांचे पत्र मोठी फ्रेम करून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. गव्हाणे, अभिनवचे मुख्याध्यापक श्री. आर. एस. वाघ आणि आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या श्रीमती पूनम मढे यांना देण्यात आले. त्यांच्या या कृतीने त्यांची विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्याप्रती असलेली आस्था व आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे व ही मुले भविष्यात आदर्श नागरिक बनून भारताला महासत्ता बनवतील हा विचार त्यांच्या या कृतीतून सिद्ध होत आहे.
त्यांनी नांदगाव तालुक्यातील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सर्व शाळा व महाविद्यालये यांना हे पत्र भेट म्हणून दिले. याप्रसंगी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब साळुंखे, श्री. रमेश अण्णा बोरसे, नगरसेवक रवींद्र घोडेस्वार, CA प्रशांत कदम, प्रा. जी. सी.बर्वे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन.जे. भाबड, प्रा. ए.पी.नवले, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.