loader image
[ays_poll id=7]

गांधीनगर मुद्रणालय पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा एकतर्फी विजय; कामगार पॅनलचा उडाला धुव्वा

Jan 15, 2023

नाशिकरोड (प्रतिनिधी) : गांधीनगर येथील दि. गवर्नमेंट ऑफ इंडिया प्रेस एम्प्लॉईज को – ऑप क्रेडिट सोसायटी लि.च्या सन २०२२- २०२७ च्या पंचवार्षिक निवडणूकीत “परिवर्तन”पॅनलने कामगार पॅनलचा सुफडा साफ केला.सत्ताधारी कामगार पॅनलच्या पदरात फक्त एक जागा पडली तर नवीनच तयार झालेल्या परिवर्तन पॅनलवर भरोसा ठेवीत सभासदांनी चौदा जागांचे भरघोस दान दिले. एकूण १५ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात होते.फक्त अनुसूचित जाती जमाती मतदार संघात काट्याची टक्कर झाली यात शेवटी दीपक पुंडलिक घोलप यांना विजयी घोषित केले गेले (पराभूत मिलिंद एकनाथ निकुंभ), तर विमुक्त/भटक्या जाती मतदार संघातून परिवर्तन पॅनलचे सुधीर आनंदराव जोशी यांनी विजय मिळविला,(पराभूत…राजेश सानप).
इतर मागासवर्गीय गटातून नवख्या दिलीप त्र्यम्बक बोराडे यांनी चालू युनियन जनरल सेक्रेटरी रवी अवारकर यांचा दारुण पराभव केला.तर दोन जागांसाठी असलेल्या महिला राखीव
गटात सौ.नीता मिलिंद शिरसाठ यांनी संगीता कोकाटे (कामगार पॅनल) यांचा पराभव केला.तर कामगार पॅनलच्या गीतांजली कोरडे ह्या एकमेव विजयी उमेदवार ठरल्या.
सर्वसाधारण मतदार संघातील दहा जागांसाठी दोन्ही पॅनल मिळून वीस उमेदवार आपले भाग्य अजमावित होते.परंतु सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला व हिटलरशाहीला कंटाळून ह्या वेळी मतदारांनी परिवर्तन पॅनलला एकतर्फी सत्ता देऊन,सत्ताधाऱ्यांची ३५ वर्षाची एकाधिकारशाही संपुष्टात आणून कामगार पॅनलच्या सर्व उमेदवारांचा धुव्वा उडवित दारुण पराभव केला. परिवर्तन पॅनलचे सर्वसाधारण गटातील सर्वच उमेदवार विजयी झाले. त्यात कैलास रमाकांत अवारे,कुंदन

प्रभाकर गायकवाड,गोकुळ मुरलीधर बोराडे,चेतन सुभाष दाणी,प्रमोद शंकरराव पवार,संदीप गणपत गायकवाड,बाळू काशिनाथ भांगरे,
प्रवीण विजय पवार,गणेश काशिनाथ रोकडे,व शेखर बाबुराव साळुंके इ.
विजयी झाले.तर पराभुतांमध्ये भरत भगवान भोगले,शेख समद मुनाफ,
लालितकुमार निरखेडे,देवेंद्र जयवंत
पगारे,भालचंद्र परचुरे,सुनील मुरलीधर पवार,रमेश राजा मकवाणा,सुधीर बालाजी मिसाळ,व्यंकटेश के एस.,व
प्रशांत जगन्नाथ भराडे यांचा दारुण पराभव झाला.
गांधीनगर वेल्फेअर क्लब हॉल येथे मतमोजणी झाली.निवडणूक निर्णय अधिकारी तालुका उपनिबंधक कार्या लया श्री कैलास आढाव व यांच्या सहकाऱ्यांनी विजयी उमेदवारांची नावे घोषित केली.त्यानंतर गुलालाची उधळण करीत,फटाक्यांची आतिषबाजी करून सर्वांनी जल्लोष केला.
निवडणुकीचा संपूर्ण कौल परिवर्तन पॅनलच्या बाजूला झुकल्याने सत्ताधाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. तर परिवर्तन पॅनलच्या आनंदात सभासदांनी घोषणांचा जल्लोष करीत विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.विजयासाठी कवी अशोक भालेराव, शिवपाल पंचभाई,
अनिल गायकवाड, लीलाधर चिखले,
दीपक शिर्के,देवेंद्र जाधव,जितेंद्र गवारे व शांताराम रूपवते,दीपक गायकवाड, रामकृष्ण शिरोळे,सोनू गंभीरे,रवींद्र महाले,अशोक परदेशी सह अनेकांनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.