loader image
[ays_poll id=7]

शिवसेना कुणाची ठाकरेंची का शिंदे गटाची – आता फैसला १७ जानेवारीला

Jan 17, 2023

निवडणूक आयोगात शिवसेना कुणाची यावर शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा सामना सुरू असून आज ही त्यावर शिक्कामोर्तब झाले नाही.दुपारी ४ वाजल्यापासून वाद आणि युक्तिवादाच्या फैरी दोन्ही गटाकडून करण्यात आल्या.अशात एक महत्त्वाचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेनेचे सगळे अधिकार उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे घेतले आणि शिवसेना पक्षप्रमुख पद तयार केले हे पदच बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला. आजच्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी मांडलेला युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. सुनावणी संपल्यानंतर दोन्ही गटांकडून प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यात आली.

ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई सुनावणी संपल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर आले. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. सव्वाचार वाजेच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली. आमचे वकील कपिल सिब्बल यांनी आमची भूमिका आयोगापुढे मांडली. हा वाद सुप्रीम कोर्टातही सुरू आहे. शिंदे गटाने केलेल्या युक्तिवादात आमदार आणि खासदारांचा बहुमत असल्याचा दावा करण्यात आला. पण निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे बहुमत म्हणजे आपला पक्ष आणि चिन्हावर दावा सांगने हे लोकशाहीला घातक आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली.
निवडणूक आयोगाने पुढील सुनावणी १७ जानेवारीला ठेवली आहे. शिंदे गटाने अनेक मुद्द्यांचा ऊहापोह केला. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर निर्णय घेण्यात यावा, असा आग्रह त्यांच्या वकिलांनी केला. पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेली ही मंडळी स्वत:च ठरवतात; पण आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पुढच्या वेळी आम्ही आमची बाजू भक्कमपणे मांडू. कारण पक्षप्रमुखाने तिकीट दिल्यानंतर ते लोकप्रतिनिधी होतात. मूळ पक्ष महत्त्वाचे आहेत. आम्ही २० लाखांहून जास्त प्राथमिक सदस्यांची प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाला दिली आहेत. आमच्या प्रतिनिधींचे प्रतिज्ञापत्रक दिले आहेत, अशी भूमिका अनिल देसाई यांनी मांडली.

तर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनावणीनंतर माध्यमांशी चर्चा केली. ते म्हणाले, आम्ही आमचा युक्तिवाद पूर्ण केला. आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे आमचीच खरी शिवसेना आहे. आमच्याकडे संघटनेचे नियंत्रण आहे. शिवसेनेची मूळ घटना २०१८ मध्ये बदलण्यात आली. ती पूर्णपणे चुकीची आहे. १९९९ मध्ये बाळासाहेबांनी घटना बनवली. २०१८मध्ये उद्धव ठाकरेंनी गुप्तपणे घटनात्मक निवडणुका रद्द केल्या. त्यामुळे एकनाथ शिंदेंसह इतरही आमदार आणि पदाधिकारी नाराज होते. त्यामुळेच हे सगळे घडून आले. शिवसेनाप्रमुख पद चुकीचे आहे असे आम्ही म्हणत नाही. फक्त पक्षप्रमुखाच्या आदेशाने ज्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या ते चुकीचे आहे.

तसेच शिंदे गटाचे वकील निहार ठाकरे यांनीदेखील भूमिका मांडली. आम्ही आमची बाजू मांडली आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे आमचे बहुमत कसे ते सिद्ध केले आहे. संघटनात्मक ताकद आमच्यासोबत कशी आहे ते आम्ही आयोगाला सांगितले आहे. पुढच्या आठवड्यात ठाकरे गट त्यांची बाजू मांडेल, असे निहार ठाकरे यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
.