loader image
[ays_poll id=7]

नवनियुक्त सदस्यांचे मतदारांचे नाव मतदार यादीत होणार समाविष्ट – बाजार समित्यांत राजकीय गणिते बदलणार

Jan 21, 2023


राज्यातील नाशिक जिल्ह्यासह बाजार समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या असून विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या, ग्रामपंचायतींच्या नवीन सदस्यांना अखेर मतदानाचा अधिकार प्राप्त होण्याचा मार्ग अखेर सुकर झाला आहे. सहकारी सोसायट्या आणि ग्रामपंचायतींवर नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारयादीत समाविष्ट होणार असून या नवमतदारांमुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील मनमाड सह १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला होता. मात्र, नवमतदारांमार्फत याद्यांवर आक्षेप नोंदवले गेले अन् घोषित झालेला निवडणूक कार्यक्रम पुन्हा एकदा लांबणीवर पडला होता. राज्य सरकारने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन ग्रामपंचायतींनी (विकास व विनियमन) अधिनियम १९६६ मधील मुख्य नियमाच्या नियम ७ मधील पोटकलम (४) नंतर पाचचा समावेश करत कायद्यात दुरुस्ती केली. त्यानुसार कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायतीच्या नव्याने निवडून आलेल्या समितीच्या बाबतीत किंवा जेव्हा कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व व्यवस्थापन समितीचे सदस्य स्वीकृत केले असेल. त्याबाबतीत पोटनियम प्रसिद्ध केलेल्या मतदारांच्या अंतिम यादीमध्ये ज्या व्यक्तीचे नाव समाविष्ट नाही, अशा कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही वेळी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे अर्ज करता येईल, जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी नेमलेली व्यक्ती चौकशी अहवाल त्यावर करून देईल. त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी अंतिम मतदार यादीमध्ये त्यास योग्य वाटेल असे आवश्यक ते बदल करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करतील. कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहकारी सोसायटी मतदारसंघातून ११ संचालक निवडून येतात. तर ग्रामपंचायत मतदारसंघातून चार संचालक निवडून दिले जातात. त्यामुळे नव्याने निवडणुका होऊन सोसायटी व ग्रामपंचायतीवर विराजमान झालेल्या सदस्यांना बाजार समितीच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी मिळाली आहे. त्यादृष्टीने राजकीयदृष्ट्याही मतदार नावनोंदणीस महत्त्व आले आहे.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.