loader image
[ays_poll id=7]

आर.ए.चषक 2023 मनमाड क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना विजेता एस.ए.चॅलेंजर संघ व उपविजेता स्पीड क्रिकेट संघ

Jan 25, 2023

मनमाड :- सनी क्रिकेट क्लब,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण मनमाड येथे झालेल्या आर.ए.चषक 2023 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एस.ए.चॅलेंजर मालेगाव संघाने स्पीड क्रिकेट मनमाड संघाचा पराभव करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रु.अकरा हजार व भव्य चषकाचा मानकरी ठरला. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रु.सात हजार व चषक स्पीड क्रिकेट संघ, मनमाड,तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पाच हजार व चषक एस.ए.चॅलेंजर संघ,मनमाड संघास देण्यात आले. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार परवेज शेख,उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार शेखर काशीद या खेळाडूंना देण्यात आले.
अंतिम सामना पाहण्यासाठी अंबादास भाऊ निकम,मा.नगरसेवक संजयभाऊ निकम,मनोज गांगुर्डे,विशालभाऊ आहिरे,हबिबभाई शेख किरणताई शिंदे,आसिफभाई खान,मनमाड क्रिकेट समितीचे सदस्य जाविद शेख सर,एम.पी.क्रिकेट अध्यक्ष राजाभाऊ जाधव उपस्थित होते.सदर मान्यवरांच्या हस्ते सर्व पारितोषिके देण्यात आले.

स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अकरा हजार रुपये विशालभाऊ तर्फे,द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सात हजार रुपये,हबिबभाई शेख यांच्या तर्फे,तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पाच हजार रुपये किरणताई शिंदे यांच्या तर्फे देण्यात आले.तसेच उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार संजयभाऊ निकम, सर्व वैयक्तिक पुरस्कार अंबादास भाऊ निकम,सर्व चषक मनोजभाऊ गांगुर्डे यांच्यातर्फे देण्यात आले. पंचाचे काम खलील कुरेशी,राहुल कापडणे,दर्शन सकट, स्कोररचे काम मेजर जगदीश लव्हाटे व समालोचन मनोज ठोंबरे (सर),लाला भाऊ मिर्झा,यांनी केले.पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनमाड क्रिकेट समितीचे अध्यक्ष मनोज ठोंबरे सर यांनी केले.राहुल कापडणे,सतीश,उज्ज्वल यांनी विशेष परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी केली.

अजून बातम्या वाचा..

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.