loader image
[ays_poll id=7]

सौ. क. मा. कासलीवाल शाळेच्या मुख्याध्यापकाच्या मनमानी कारभारा विरोधात सुरू असलेले उपोषण लेखी आश्वसनानंतर अखेर मागे

Jan 25, 2023


नांदगाव – (सोमनाथ घोंगाणे)

नांदगाव तालुक्यातील कोणतेही काम असो ते उपोषण, आंदोलन, मोर्चा या शिवाय होतच नाही याचा अनुभव पुन्हा एकदा आला असून गेल्या तीन दिवसांपासून लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या उपोषणा पुढे अखेर प्रशासन व संस्था चालक झुकले आणि सेवा निवृत्त उपोषण करते रमेश आहेर यांच्या सर्व मागण्या मान्य करून जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक)जिल्हा परिषद नाशिक यांनी पत्र जा क्रमांक/जिपना/शिक्षण/माध्यमिक/735/2023 दिनांक 25/01/2023 नुसार दिलेल्या लेखी आश्वासना नुसार उपोषण मागे घेण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून सनदशीर मार्गाने सुरू असलेले हे उपोषण मोडून काढण्यासाठी काही मुजोर अधिकार्‍यांनी पदाचा गैरवापर करून अनेक अडथळे निर्माण करून उपोषण करण्यास मज्जाव केला परंतु उपोषण करते आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने अखेर न्याय मिळाल्याने पुन्हा एकदा नांदगाव मध्ये आंदोलन शिवाय पर्याय नाही हे अधोरेखित झाले.
उपोषण काळात प्रहार संघटनेचे अध्यक्ष शेखर दादा पगार, T D F संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर डि निकम, योगेश पाटील, अशोक कदम, तसेच शिवसेनेचे संतोष गुप्ता, मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गनी शाह ,रशीद अहमद, किरण गोळे, आदी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले.
नांदगाव येथील सौ कमलाबाई माणिकचंद कासलीवाल या शाळेचे मुख्याध्यापक गोरख डफळ व संस्था चालक हे गेल्या दिड वर्षापासुन रमेश आहेर यांची अडवणूक करीत त्यांचे निवृत्ती नंतरचे लाभ मिळणेकामी टाळाटाळ करीत होते अनेक वेळा चर्चा, विनंती करूनही सहकार्य मिळत नसल्याने शेवटी उपोषण चे हत्यार उपसले असता वठणीवर येत घंटो का काम मिनीटो मे झाले आहे. उपोषण करते रमेश आहेर हे माजी आमदार व माजी पंचायत समितीचे सभापती यांचे भाऊ असताना ही त्याचेवर क्षुल्लक कामासाठी तब्बल तीन दिवस उपोषण करावे लागले हे या तालुक्याचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे  जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

  नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा....

read more
.