ग्रामपंचायत कारभारातील महत्त्वाचे घटक असलेल्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, या घटकाला कार्यक्षम व कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये रोज कार्यालयीन वेळेत उपस्थितीसाठी आता बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याबाबतचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.
यामुळे ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना यापुढे बायोमेट्रिक मशिनवर हजेरी लावावी लागणार आहे. या आदेशामुळे शेतकरी, ग्रामस्थांना आता ग्रामसेवकाची भेट घेणे सोपे होणार आहे.












