Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सार्वजनिक शिवजयंती च्या अध्यक्ष पदी आमदार सुहास आण्णा कांदे तर कार्याध्यक्षपदी मयूर बोरसे यांची निवड

Jan 26, 2023

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची बैठक काल हिरूभाऊ गवळी मंगल कार्यालय मनमाड येथे संपन्न झाली.

सन 2022 चे शिवजयंती उत्सव अध्यक्ष कय्याम सैय्यद यांनी या बैठकीचे आवाहन केले होते, या प्रसंगी सर्व पक्षाचे पदाधिकारी, सर्व समाज बांधव व मनमाड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन वर्ष आधी कोविड मुळे शिव जयंती साजरी करता आली नाही तर मागील वर्षी नियम अटी पाळत साजरी झाली होती. या वर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी अशी ईच्छा सर्वांनी व्यक्त केली. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले.

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून आपल्याला सर्व समावेशक लोक प्रतिनिधी मिळाले आहेत, सर्व जाती पंथाला सोबत घेऊन चालतात, मोठ्या प्रमाणात विकासाचा धडाका त्यांनी लावलेला आहे, आपल्यातला आपला माणूस म्हणून त्यांनी स्वतची ओळख निर्माण केली आहे आणि म्हणून बैठकीत उपस्थितांनी आमदारांनी या वर्षीच्या शिवजयंती अध्यक्ष पद भूषवावे असा आग्रह धरला, सर्वांच्या आग्रहाचा मान ठेवत आमदार सुहास आण्णा कांदे यांनी अध्यक्ष पद स्वीकारले. तर कार्याध्यक्ष पदी मयूरभाऊ बोरसे यांची निवड करण्यात आली.

आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तसेच अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, बबलुभाऊ पाटील, साईनाथभाऊ गिडगे, मावळते शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष कय्याम सय्यद, रवींद्र घोडेस्वार,सचिन दराडे, राजाभाऊ भाबड,जय फुलवाणी, गंगादादा त्रिभुवन,सादिक तांबोळी, फिरोज शेख, नितीन पांडे, पंकज खताळ, सुनील साळवे,महेंद्र शिरसाठ,नाना शिंदे, यांनी या वर्षी शिवजयंतीचा मोठ्या उत्साहात साजरी करावी, मनमाड रन, सांस्कृतिक कार्यक्रम,आयोजित करण्याचा सूचना केल्या.
दोन वर्षांपासून कोविड मुळे जयंती साजरी करण्यावर काही निर्बंध असल्याने मोठ्या प्रमाणात साजरी करता आली नाही पण या वेळी आमदार कांदे यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करण्याचे ठरविले असून आम्ही सर्व तन मन धनाने काम करू अशी ग्वाही दिली.

या प्रसंगी आर पी आय चे राजाभाऊ अहिरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुनीलभाऊ हांडगे,युवासेना शहरप्रमुख योगेशभाऊ इमले, काँग्रेसचे संतोषभाऊ अहिरे,आमीन पटेल, बुडन बाबा,राष्ट्रवादीचे अमजद पठाण,आरपीआयचे प्रमोद अहिरे,गुरु निकाळे, वैद्यकीय मदत कक्षाचे पिंटू वाघ,महावीर ललवानी,आप्पा आंधळे, मुकुंद झाल्टे, अज्जूभाई शेख, सुभाष माळवतकर,लोकेश साबळे,महेश बोराडे,दादा घुगे, लाला नागरे,बापू शिंत्रे, दिनेश घुगे, संदीप बागुल, सुनील ताठे, पंकज भवर, शुभम दराडे,दिलीप सोनवणे, राजेंद्र कोल्हे,धनंजय आंधळे,फिरोज पठाण,मिलिंद पाथरकर, शब्बीर शेख,जुबेर शेख, अमोल लांडगे अरविंद जाधव, तय्यब शेख, कृष्णा जगताप, प्रमोद राणा, महेश वाडेकर, मोहसीन पठाण,विलास परदेशी, आकाश खैरे,शिवलिंग हिरणवाला, अश्पाक शेख, ज्ञानेश्वर उगलमुगले,अनिल पगार, हेमंत माळवतकर, अमोल दंडगव्हाळ,कृष्णा सोनवणे, गणेश सोमासे, जीवन जगताप, मच्छिंद्र सांगळे, सचिन छाजेड, सोनू सोनावाला , सचिन छाजेड, कृष्णा नेरकर संजय दराडे, करण बहोत, बबलू कच्ची, सोहम नागापुरे, आसिफ शेख, वाहीट शेख, भैय्या शेख ,इम्तियाज शेख,आनंद दरगुडे,कुणाल विसापूरकर,निलेश व्यवहारे , महिला आघाडीच्या कल्पना दोंदे, सुरेखा डाके, वंदना जगताप, प्रतिभा अहिरे, नीतू परदेसी, उषा शिंदे,नीता लोंढे,वंदना शिंदे,अलका कुमावत, छाया कोकाटे, संगीता सांगळे, संगीता घोडेराव,चैताली सोनवणे, यशोदा खलसे आदि उपस्थितीत होते. सूत्रसंचालन जाफर मिर्झा व बापू वाघ यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]