loader image
[ays_poll id=7]

नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून महिलेचा मृत्यू तर तीन गंभीर

Jan 28, 2023


दरेगाव – मनमाड मालेगाव महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास कुंदलगाव शिवारात कार अपघातात येवला येथील सिमा प्रमोद केदार यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

येवला तालुक्यातील चिचोंडी वीज उपकेंद्रांचे उप अभियंता प्रमोद केदार हे आपल्या पत्नी व मुलांसह मालेगाव हून येवल्याकडे कार क्रमांक एम एच ४१,ए झेड ००४० ने जात होते. याचवेळी कुंदलगावजवळ एका वळणावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार एका झाडावर आदळली. या अपघातात अभियंता प्रमोद केदार यांच्या पत्नी सिमा केदार जागीच ठार झाल्या. तर स्वतः प्रमोद केदार व त्यांची मुलगा व मुलगी गंभीर जखमी आहेत . या अपघातानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे.
यावेळी घटनास्थळी पोलिस हवालदार पालवी, उत्तम गोसावी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.