loader image
[ays_poll id=7]

मनमाडच्या मुश्ताक शेख ने पटकावला नाशिक श्री किताब

Jan 29, 2023

नाशिक जिल्हा बॉडीबिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक येथे हबीब क्लबतर्फे घेण्यात आलेल्या नाशिक श्री मास्टर या जिल्हास्तरीय स्पर्धेत मनमाडच्या मुश्ताक शेखने अजिंक्यपद पटकावले. त्यामुळे एक तपानंतर नाशिक श्री किताब मनमाडला मिळाला आहे. या कामगिरीबद्दल मुश्ताकचे मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यात कौतुक होत आहे.

नाशिक जिल्हा बॉडीबिल्डिंग असोसिएशन व हबीब क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा झाली. शेख हे भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असून, त्यांनी या आधीही अनेक किताब मिळविले आहेत. दिवसभर सरकारी कार्यालयात कर्मचारी म्हणून काम केल्यानंतर रात्रीच्या वेळी आपल्या शरीराला वेळ देऊन व्यायाम करत मोठ्या मेहनतीने त्यांनी आपले शरीर बनविलेले आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात तसेच इतर राज्यातही मुश्ताक यांनी अनेक बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे.

नाशिक येथे पार पडलेल्या या स्पर्धेत श्री मास्टर या किताबासाठी जवळपास १८ स्पर्धक सहभागी झाले होते. या सर्वांना मागे टाकत मुश्ताकने यश संपादन केले. दरम्यान, यापुढेही मेहनत सुरू ठेवून राज्यस्तरावर खेळण्यासाठी तसेच इतर तरुणांना बॉडीबिल्डिंग स्पर्धेसाठी तयार करणार असल्याचा निर्धार शेख यांनी व्यक्त केला आहे.

अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
.