Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राशी भविष्य : ३० जानेवारी २०२३ – सोमवार

Jan 30, 2023

मेष – आज वाद होण्याची शक्यता आहे. आज एखाद्या धार्मिक किंवा परोपकारी कार्यासाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांशी मतभेद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. दुपार नंतर मन प्रफुल्लित राहील. शारीरिक स्वास्थ्य मिळेल. 

वृषभ – आज स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील. कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील. यश व कीर्ती वाढेल. स्त्रियांना माहेरहून चांगल्या बातम्या मिळतील. शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्नता जाणवेल. 

मिथुन – आज सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्तता मिळू शकेल. प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुख- समाधान लाभेल. व्यापार – व्यवसायात यश मिळवू शकाल. आपल्या कामगिरीचे कौतुक होऊन वरिष्ठ आपणांवर खुश होतील.

कर्क – आज अवैध व निषेधार्ह विचारां पासून दूर राहणे हितावह होईल. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर परदेशातून एखादी चांगली बातमी येईल. संतती विषयक चिंता निर्माण होईल.

सिंह – आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने आज आपण प्रसन्न व आनंदित राहाल. मित्र व संबंधितांसह हिंडण्या- फिरण्याचा बेत आखून आनंददायी सहल सुद्धा करू शकाल. सामाजिक सन्मान होतील.

कन्या – आज प्रतिस्पर्धी व वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. मनोरंजनात्मक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसा खर्च होईल. व्यवसायात वातावरण चांगले राहील. मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगले असेल. 

तूळ – आज आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे लेखन किंवा अन्य विधायक कार्य करण्यात आपण आघाडीवर असाल. विचारात सातत्यपूर्ण बदल झाल्याने मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. आज शक्यतो प्रवास टाळावा. अचानक खर्च उदभवण्याची शक्यता आहे. दुपार नंतर कामे यशस्वी झाल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृश्चिक – आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. स्वभावातील हट्टीपणा सोडल्यास अनेक समस्या सुटतील. आज नवीन वस्त्रे, अलंकार व सौंदर्य प्रसाधने ह्यावर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे.

धनु – आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. मित्र व स्वकीयांसह वेळेचा सदुपयोग आनंददायी वातावरणात करू शकाल. दुपार नंतर शारीरिक व मानसिक दृष्टया आपण बेचैन राहाल.

मकर – आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल. सामाजिक स्तरावर यश व कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने विवाहेच्छुकांना यश मिळेल.

कुंभ – आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज प्रापंचिक गोष्टीं ऐवजी गूढ विषयांकडे आपला जास्त कल होईल. नकारात्मक विचार काढून मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता दिवसभर राहील.

मीन – आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आजचा दिवस कोणाशी आर्थिक व्यवहार करण्यास अनुकूल नाही. आज वाद संभवतात. मन एकाग्र होण्यात अडचणी येतील. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आप्तांशी कटुता निर्माण होईल.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये इ.१o वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये इ.१o वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ आसनव्यवस्था जाहीर.

मनमाड : इ.१o वी प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ केंद्र क्रमांक 1376 एच.ए.के. हायस्कूल अँड...

read more
मनमाड शहरातील नगरचौकी येथील अंतर्गत पाईपलाईन कामाचे  सौ.अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

मनमाड शहरातील नगरचौकी येथील अंतर्गत पाईपलाईन कामाचे  सौ.अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

मनमाड - आजपर्यंत फक्त पाण्यासाठीचे आश्वासने मिळालीत.एकदा एक योजना मंजूर झाली.मात्र काम न करताच...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]