loader image
[ays_poll id=7]

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये लाला लजपतराय यांची जयंती साजरी”

Jan 30, 2023

के आर टी शाळेत लाला लजपतराय यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे .विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते लाला लजपतराय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .त्यावेळेस शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर .उपप्राचार्य वैभव कुलकर्णी उपस्थित होते .कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सातवी .व इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. इयत्ता सातवीच्या कादंबरी पाटील. अभंग जोशी .श्रद्धा सांगळे .या विद्यार्थ्यांनी लाला लजपतराय यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील लाल. बाल .पाल या तीन प्रमुख नायकांपैकी ते एक होते. या त्रिकोणातील प्रसिद्ध लाला लजपतराय केवळ एक निस्सिम देशभक्त शूर स्वातंत्र्य सैनिक आणि एक चांगले नेताच होते असे नव्हे .तर एक उत्तम लेखक वकील समाज सुधारक आणि आर्य समाजी देखील होते .शेर- ए -पंजाब या उपाधीने सन्मानित आणि भारतातील महान लेखक लाला लजपत राय यांचा जन्म धुडीके या गावी एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील राधाकृष्ण एक चांगले शिक्षक होते .लालाजींच्या परिवारातील संस्कारांनीच त्यांना देशभक्तीच्या कार्याची प्रेरणा दिली होती .या विद्यार्थ्यांना सौ अनिता शाकाद्विपी .सौ सोनाली सरस्वती यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कशिश आव्हाड या विद्यार्थिनीने केले. 

अजून बातम्या वाचा..

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

मनमाड - उबाठा गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी काल रात्री अनेक पदाधिकाऱ्यांसह...

read more
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

सालाबादाप्रमाणे नांदगांव शहारातील हिन्दु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले आराध्य दैवत मस्तानी (आम्मा)...

read more
सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी 2024 या परीक्षेत...

read more
बघा व्हिडिओ : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवास आज पासुन प्रारंभ – श्री क्षेत्र पैठण येथुन मनमाडच्या दिशेने नाथज्योतीचे प्रस्थान

बघा व्हिडिओ : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवास आज पासुन प्रारंभ – श्री क्षेत्र पैठण येथुन मनमाडच्या दिशेने नाथज्योतीचे प्रस्थान

मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची मनमाड येथील महर्षी...

read more
.