loader image

मनमाड शहरात आठवडे बाजारात नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन परप्रांतीय चोरट्यांना अटक – मनमाड शहर पोलिसांची कामगिरी

Jan 30, 2023


मनमाड शहरात रविवारच्या आठवडे बाजारात नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन भामट्यांना मनमाड शहर पोलिसांनी शिताफीने पकडत त्यांच्याकडून दोन मोबाईल हस्तगत केले.

याबाबत माहिती की, दिनांक २९-०१-२०२३ रोजी मनमाड शहरातील रविवारी भरलेल्या आठवडे बाजारातुन आठवडे बाजारात बाजार खरेदी साठी आलेल्या दोन नागरिकांचे मोबाईल चोरीस गेले होते. त्याबाबत मनमाड शहर पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून मनमाड शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री प्रल्हाद गिते यांनी लागलीच आठवडे बाजारात पेट्रोलिंग साठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना सुचना दिल्या असता आठवडे बाजारात साई प्रसन्न लॉन्स समोर संशयास्पद हालचाल करतांना मिळुन आलेले ०१) सुनिल कोयल पवार वय २२ वर्ष ०२) लकी परबेसिंग सोलंकी वय २० वर्ष दोन्ही राहणार २८, मेनरोड, उनिदा भोपाल मध्यप्रदेश यांची चौकशी करुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात गुन्हयात चोरीस गेलेले दोन मोबाईल व एक मोटारसायकल मिळुन आली. आरोपीतांना गुन्हयात अटक करुन त्यांना मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांची दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे. आरोपीतांकडुन अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई मा. श्री. शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामिण, मा. श्री. अनिकेत भारती, अपर पोलीस अधिक्षक, मालेगांव, मा. श्री समिरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मनमाड शहर पोलीस स्टेशनचे सपोनि श्री प्रल्हाद गिले. पोना गणेश नरोटे, पोना मुदस्सर शेख पोशि गौरव गांगुर्डे, पोशि राजेन्द्र खैरनार, पोशि रणजित चव्हाण, पोशि संदिप झाल्टे, पोशि राहुल बस्ते, मपोशि सपना गवांदे यांनी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.