loader image
[ays_poll id=7]

मेडिकव्हर हॉस्पिटल येथे ५० रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी

Feb 1, 2023


प्रतिनिधी : उत्तर महाराष्ट्रातील पहिले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे सुरु करण्यात आल्यानंतर अवघ्या एका महिन्यात ५० पेक्षा अधिक रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी यशस्वी पणे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक येथे करण्यात आल्या. वैद्यकीय क्षेत्रासाठी हि उल्लेखनीय बाब तर आहेच परंतु संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी हि अत्याधुनिक सुविधा आरोग्यदायी आहे. सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (TKR) आता नव्या युगाकडे वाटचाल करत आहे . शस्त्रक्रियेतील साहित्य, उपकरणे आणि तंत्रांमध्ये बर्‍याच सुधारणांमुळे या प्रक्रियेची परिणामकारकता खूप वाढली आहे. अचूक इम्प्लांट पोझिशनिंग आणि अलाइनमेंटच्या आव्हानांवर मात करण्यासाठी, नाविन्यपूर्णतेची सतत गरज भासत असते. संगणकाच्या सहाय्याने शस्त्रक्रिया नवोपक्रमाचा एक नवीन टप्पा सुरू झालेला आहे आणि जर आपण अलीकडील ट्रेंड आणि प्रगती तंत्रज्ञानाबद्दल बोलायचे झाल्यास , रोबोटिक्सने वर्तमान आणि भविष्यासाठी नवा मार्ग दाखवला आहे. गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियांसाठी जगातील पहिला ( CUVIS) हा स्वायत्त रोबोट आहे ..अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाविन्यपूर्ण आणि कार्यक्षम सेवांद्वारे प्रगत वैद्यकीय सेवेसाठी वचनबद्ध आहेच परंतु या अत्याधुनिक तंत्रज्ञानच्या साह्याने परिणामकारक उपचार आता रुग्णांवर होत आहेत. असे प्रतिपादन मेडिकल डायरेक्टर तथा नवजात शिशु व बालरोग तज्ञ् डॉ सुशील पारख यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

रोबोटिक गुडघा बदलण्यात सामान्यत: खालील गोष्टींचा समावेश होतो इन-क्लिनिक निदान,सीटी-स्कॅन शस्त्रक्रियापूर्व नियोजन (व्हर्च्युअल सिम्युलेशन),स्वायत्त रोबोटिक सर्जिकल प्रक्रिया,हॉस्पिटलमधून लवकर डिस्चार्ज,पारंपारिक मॅन्युअल सर्जिकल प्रक्रियेच्या तुलनेत, रोबोटिक गुडघा बदलण्याचे बरेच फायदे आहेत रोबोटिक गुडघा बदलण्याचे चांगले इम्प्लांट पोझिशनिंग, अचूक शस्त्रक्रिया हाड कापणे, कमीत कमी मानवी हस्तक्षेप, जलद पुनर्प्राप्ती आणि कमीत कमी हॉस्पिटलमध्ये राहणे असे बरेच फायदे असल्याचे आणि अत्याधुनिक रोबोटच्या साह्याने शस्त्रक्रिया विषयी सविस्तर माहिती सांधे विकार व सांधे बदल शस्त्रक्रिया तज्ञ् डॉ प्रणित सोनावणे यांनी पत्रकारांना दिली.यासोबतच डॉ प्रणित सोनावणे यांनी ५०० यशस्वी सांधे बदल शस्त्रक्रिया करून वैद्यकीय क्षेत्रात एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.
पत्रकार व उपस्थित रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचे आभार व्यक्त करताना केंद्र प्रमुख समीर तुळजापूरकर म्हणाले कि , मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये असलेल्या अनुभवी, निष्णात डॉक्टरांची टीम आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि कुशल कर्मचारी यांच्या उपलब्धते मुळे आणि मेहनतीमुळे सांधे प्रत्यारोपण सारख्या शस्त्रक्रिया यशस्वी पणे पार पडतात तसेच प्रत्यारोपणानंतर रुग्णाची स्वछता आणि जेवणाची खूप काळजी घ्यावी लागते, रुग्णाला कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होणार नाही याची हि काळजी घेतली जाते . सांधे प्रत्यारोपण करण्यासाठी आधी मुंबई किंवा पुण्याला जावे लागत होते परंतु आता हि सुविधा नाशिक मधेच असल्याने आता कुठेही जाण्याची गरज नाही रुग्णाला सगळ्या सुविधा नाशिक मधेच उपलब्ध झाल्याने त्याची आर्थिक बचत होत आहे .अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स मध्ये आम्ही नेहमीच दर्जेदार उपचार आणि काळजी प्रदान करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करत असतो.

या प्रसंगी मेडिकल डायरेक्टर तथा नवजात शिशु व बालरोग तज्ञ् डॉ सुशील पारख , सांधे विकार व सांधेप्रत्यारोपण शस्त्रक्रिया तज्ञ्, डॉ प्रणित सोनावणे , डॉ बाबुलाल अग्रवाल, डॉ चंद्रकांत चव्हाण , डॉ स्नेहल धात्रक , डॉ रोहन देव , मार्केटिंग हेड पियुष नांदेडकर हे मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. या प्रसंगी रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.