loader image

स्व.उद्योगपती श्री.संपतलालजी सुराणा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त निःशुल्क हृदयरोग चिकित्सा शिबिरात १२० गरजुंची तपासणी

Feb 1, 2023


श्री आनंदऋषिजी हॉस्पिटल एंड हार्ट सर्जरी सेंटर अहमदनगर, श्री आनंद धर्मार्थ दवाखाना मनमाड, श्री के. बी. आबड होम्योपैथिक कॉलेज, नेमिनगर ,चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. उद्योगपती श्री संपतलालजी सुराणा यांचा प्रथम स्मृतिदिन प्रीत्यर्थ,सुराणा चॅरिटेबल ट्रस्ट चे ट्रस्टी श्री पोपटलालजी सुराणा, श्री शशिकांतजी सुराणा,श्री अजितजी सुराणा यांच्या सहयोगाने आयोजित निशुल्क हृदय रोग चिकित्सा शिबिर दिनांक 29 /01/2023 रविवार
रोजी जैन भवन येथे आयोजित करण्यात आले होते. ह्या शिबिरात डॉ. श्री राहुलजी अग्रवाल (DM CARDIOLOGY ,नगर.), डॉ श्री रविन्द्रजी यळीकर ह्या तज्ञ डॉक्टर्स च्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली. शिबिरात 120 पेशंट तपासण्यात आले, सर्वांचे ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, पल्स ऑक्सिजन, ईसीजी घेण्यात आले व गरजू पेशंट ला पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. सदरहू शिबिराचे उदघाटन सुराणा चॅरिटेबल ट्रस्ट चे श्री पोपटलालजी सुराणा ,श्री वर्धमान स्थानकवाशी श्रावक संघाचे संघपति श्री रीखबचंद ललवानी ,IMA चे अध्यक्ष डॉ श्री प्रविणजी शिंगी, डॉ श्री शांतारामजी कातकडे,श्री अमृत महिला मंडळचे सौ. मुनोत,सौ. ओस्तवाल आदि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

श्री के. बी. आबड होम्योपैथिक कॉलेज चांदवड येथील इंटरनी डॉक्टर्स व सपोर्ट स्टाफ चे विशेष सहकार्य लाभले. शिबिराचे आयोजन श्री अमृत महिला मंडळ संचालित आनंद धर्मार्थ दवाखाना मनमाड तर्फे, मार्गदर्शक डॉ श्री सुनीलजी बागरेचा,डॉ श्री सागरजी जैन, श्री दीपकजी मुनोत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ श्री नीलेशजी राठी, डॉ सतीशजी चोरडिया, डॉ विकासजी चोरडिया, डॉ आकाश जैन, डॉ धीरज बरडीया,डॉ नितीन जैन, डॉ श्री पारसजी जैन,केमिस्ट श्री अशोक भंडारी, श्री राजेन्द्र मुथा,श्री सुनील बोगावत, श्री योगेश ताथेड,श्री पियुष भंडारी, श्री अक्षय हिरण यांच्या सहकार्याने आनंद धर्मार्थ दवाखान्याचे अध्यक्ष डॉ श्री दिलीप मुथा व सेक्रेटरी श्री सचिन लुणावत यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.