loader image
[ays_poll id=7]

महावितरणने पुरवली विक्रमी २४,७५० मेगावॅट वीज

Feb 2, 2023

नाशिक/मुंबई, दि.२ फेब्रुवारी २०२३ :
महावितरणने ३१ जानेवारी २०२३ रोजी राज्यभरातील ग्राहकांना २४,७५० मेगावॅट इतका आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रमी वीज पुरवठा केला, अशी माहिती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

कोरोनाची साथ येण्यापूर्वीच्या २०१९ – २० या आर्थिक वर्षात फेब्रुवारी २०२० मध्ये सर्वाधिक २१,५७० मेगावॅट वीज पुरवठा महावितरणने केला होता. मार्चच्या अखेरीस कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाला आणि आर्थिक व्यवहार ठप्प झाले. परिणामी औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा वीज वापर खूप कमी झाला पण घरगुती ग्राहकांचा वीजवापर वाढला. त्यावेळी एप्रिल २०२० या महिन्यातील एका दिवसातील सर्वाधिक वीज पुरवठा १६,६९० मेगावॅट इतका झाला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रभाव कमी होऊन लॉकडाऊन मागे घेण्यात आला तसा वीजवापर वाढला. २०२० – २१ या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत मार्च महिन्यात सर्वाधिक वीज पुरवठा २२,५५४ मेगावॅटवर पोहोचला.

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आर्थिक व्यवहार वाढत गेले आणि राज्यातील वीजवापरही वाढला. २०२१ -२२ या आर्थिक वर्षातील सर्वाधिक वीज पुरवठा मार्च २०२२ या महिन्यात २४,२१९ मेगावॅट इतका झाला.

चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यात वीजवापर मोठ्या प्रमाणात होत असून एप्रिल २०२२ महिन्यात सर्वाधिक वीजपुरवठा २४,६६८ मेगावॅट इतका होता. जुलै या पावसाळी महिन्यात सर्वाधिक वीज पुरवठा १९,१५७ मेगावॅट इतका होता. ऑगस्टमध्ये हा आकडा वाढला. पुढे त्यात थोडी कपात होऊन सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ मध्ये सर्वाधिक वीज पुरवठा अनुक्रमे १९,०७६ मेगावॅट व १९,०२२ मेगावॅट इतका झाला. त्यानंतर राज्यातील वीजवापर आणखी वाढत गेला. डिसेंबर हा थंडीचा महिना असूनही त्या महिन्यातील सर्वाधिक पुरवठा २४,०६७ मेगावॅट एवढा होता. जानेवारी महिन्याच्या अखेरीस तर २४,७५० मेगावॅट इतक्या सर्वाधिक वीज पुरवठ्याचा विक्रम झाला.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.