loader image

चाचा नेहरू बालमहोत्सवामुळे मिळाला बालकांच्या विविध कलागुणांना वाव! -चंद्रशेखर पगारे विभागीय उप आयुक्त महिला व बाल विकास नाशिक

Feb 4, 2023


नाशिक- महिला व बालविकास विभाग,महाराष्ट्र शासन व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक यांच्यावतीने मिनाताई ठाकरे विभागीय क्रिडा संकुल नाशिक येथे १ ते ३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत “चाचा नेहरू बाल महोत्सवाचे”आयोजन करण्यात आले होते..या महोत्सवाचे उद्घाटन मा. सायलीताई पालखेडकर सदस्य महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग मुंबई यांच्याहस्ते झाले..१ ते ३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत चाललेल्या या बालमहोत्सवात जिल्हातील महिला व बाल विकास विभागाच्या मान्यता प्राप्त संस्थांमधील बालकांनी व तेथील कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवीला..मा. चंद्रशेखर पगारे विभागीय उप आयुक्त महिला व बाल विकास विभाग नाशिक हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते..या बाल महोत्सवात ३ दिवसांत कब्बडी,खो- खो,रनिंग,रिले,गोळा फेक, लांब उडी, बुद्धिबळ,कॅरम,चित्रकला,वक्तृत्व , निबंध, हस्ताक्षर, एकल व समूह नृत्य इ. स्पर्धा झाल्या..या बाल महोत्सवामुळे बालकांच्या विविध कलागुणांना वाव मिळाल्याचे मनोगत चंद्रशेखर पगारे यांनी व्यक्त केले..तर सायलीताई पालखेडकर यांचेसह सर्वांनी तीनही दिवस बाल महोत्सवास उपस्थित राहून बालकांच्या विवीध कलागुणांंचे कौतुक केले..बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष मा. न्यायमूर्ती वैष्णवी माने यांनीही पारितोषिक वितरणावेळी बालकांचे कौतुक केले..

३ फेब्रुवारी २०२३ रोजी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले. सदर महोत्सवात मा. सायलीताई पालखेडकर सदस्य महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग मुंबई, मा. चंद्रशेखर पगारे विभागीय उप आयुक्त महिला व बाल विकास नाशिक विभाग, मा. दिपक चाटे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, मा. अरविंद चौधरी जिल्हा क्रिडा अधिकारी नाशिक,सर्व मा.बाल विकास प्रकल्प अधिकारी सुनिल दुसाने, मंगला भोये, राकेश कोकणी, गणेश सहाणे, अर्जुन झरेकर,मा.मिलिंद बाबर अध्यक्ष बाल कल्याण समिती, सर्व मा.सदस्य बाल कल्याण समीती गोपाळ शिंपी, भास्कर मोरे, पल्लवी घुले, भगवान येलमामे, सर्व मा. सदस्य बाल न्याय मंडळ शोभा पवार, गणेश कानवडे, मा. संजय गायकवाड समन्वयक महिला आर्थिक विकास महामंडळ, चंदुलाल शहा सचिव जिल्हा परिविक्षा अनुरक्षण संघटना नाशिक,चाईल्ड लाईन, सेव्ह द चिल्ड्रन, यांनी सहभाग नोंदवीला. जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री..अजय फडोळ यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले..


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.