loader image
[ays_poll id=7]

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची नांदगाव तालुक्यात शिव संवाद यात्रा

Feb 4, 2023


नांदगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांची होणारी पिळवणुक तसेच त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना एकत्रित करुन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना न्याय मिळावा म्हणून पक्षाचे युवानेते, युवा सेनाप्रमुख, आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा नांदगाव येथे मंगळवार दि. ०७/०२/२०२३ रोजी दुपारी २.०० वा. ज.ता.का. जैन धर्मशाळा, नांदगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर संवाद यात्रेमध्ये शेतकरी बांधवांना भेटून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे.

शिवसेना पक्षातर्फे नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने वेळोवेळी शेतकऱ्यांच्या समस्या व मागण्या पक्षातर्फे सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला तसेच काही प्रलंबित मागण्यांबाबत आदित्य ठाकरे यांना नांदगाव तालुका विधानसभा मतदारसंघातर्फे निवेदन देण्यात येणार आहे. सदर निवेदनामध्ये काही प्रमुख मागण्या व प्रश्न मांडण्यात येणार आहे. त्यातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे :-

१) मनमाड शहराच्या माननीय नगराध्यक्षा सौ. पद्मावतीताई धात्रक व मनमाड नगरपालिका सन्माननीय कौन्सील, मनमाड़ बचाव कृती समिती, मनमाड पाणीप्रश्न जनहित याचिकाकर्ते, सामाजिक संघटना, आंदोलनकर्ते, डॉक्टर, व्यापारी, वकिल, पत्रकार बंधु व समस्त मनमाडकर बांधवांच्या पाठपुराव्याने/ व तत्कालीन मुख्यमंत्री मा. उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने करंजवन योजना पुर्णत्वास येत आहे त्याचा पाहणी दौरा करणे. 

२) शासकीय योजना राबवून मांजरपाड्याचे पाणी नांदगाव तालुक्याला मिळावे.

३) सर्व शेतकरी बांधवांच्या पीकाला हमीभाव मिळावा. (स्वामीनाथन आयोग लागू (करावी) 

4) नारपार पाणीपुरवठा योजनेच्या शासकीय आराखड्यामध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश करण्यात यावा.

५) जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सर्व कर्जदार शेतकरी व नागरिकांसाठी ओ.टी.एस. स्किम लागू करुन बँकेकडून सक्तीची वसुली बंद करुन ७/१२ उताऱ्यावरुन बोजा कमी करण्यात यावा. 

६) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी बांधवांची होणारी पिळवणुक, अन्याय व बाजार समितीचा मनमानी कारभार त्वरीत थांबवावा.

उपरोक्त मुद्द्यांचा समावेश निवेदनात करण्यात येणार आहे जेणेकरुन शेतकरी बांधवांना शासन दरबारी न्याय मिळेल व त्यांची होणारी पिळवणूक थांबेल तरी नांदगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनी, नागरिकांनी व महिला भगिनींनी मा. आदित्य साहेबांच्या शिव संवाद यात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आले आहे.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
.