loader image
[ays_poll id=7]

शुभांगी पाटील शिवबंधनात; मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश

Feb 5, 2023

नाशिक शिक्षक व पदवीधर मतदारसंघातून पराभूत झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी शनिवारी ठाकरे गटात प्रवेश केला. खऱ्या लढाईला आता सुरुवात झाली आहे, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर दिली.
विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाने सर्वप्रथम शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांची महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. मात्र त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. पराभवानंतर शुभांगी पाटील यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तेथे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

ठाकरे गटात प्रवेश केल्यावर शुभांगी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी आधीच जाहिर केले की ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. त्यानुसार आज मी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माझा पराभव झाला असला तरी आता तर खरी लढाई सुरु झाली आहे. मी एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहे. जुनी पेन्शन योजना, बेरोजगारी व अन्य प्रश्नांकडे या आंदोलनातून सरकारचे लक्ष वेधणार आहे.
माझा पराभव झाला असला तरी मला ४० हजार मते पडली आहेत. माझी नऊ हजार मते बाद ठरली आहेत. एका सामान्य घरातील मुलीला एवढी मते मिळाली. जनतेच्या प्रेमामुळेच मला एवढी मते मिळाली हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.