loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरातील शेकडो महिलांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्ष प्रवेश

Feb 7, 2023

मनमाड – आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या विकासाचा झंजावात आणि सौ.अंजुम ताई कांदे यांचा महिला वर्गात असलेला मोठा जनसंपर्क पाहता मनमाड शहरातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यात काम करण्यासाठी पुढे येत आहेत.

सौ.अंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना महिला आघाडी सतत मनमाडकर महिलांच्या अडी अडचणी सोडवण्यात सक्रिय असतात. विविध सांस्कृतिक उपक्रम, महिलांच्या व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, महिलांच्या अडी अडचणी चे त्वरित निवारण करण्यासाठी महिला आघाडी नेहमीच सहकार्याची भूमिका घेत असतात. यामुळेच मनमाड शहरातील असंख्य महिला शिवसेना महिला आघाडीत काम करण्यास उत्सुकता दाखवत आहे.
सोमवारी शिवसेना संपर्क कार्यालय मनमाड येथे शेकडो महिलांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. सौ अंजुमताई कांदे यांनी महिलांना शिवबंधन बांधत सर्वांचे स्वागत केले.
या प्रसंगी महिलांशी त्यांनी संवाद साधला. प्रत्येक महिलेने फक्त चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर पडले पाहिजे, कुटुंबाचा गाडा हाकताना स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करायला पाहिजे, आणि या साठी आम्ही महिला आघाडी आपल्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
मनमाड शहरातील महिलांच्या जिव्हाळ्याचा कित्येक वर्ष प्रलंबित असलेला पाणी प्रश्न आमदारांनी सोडवल्या बद्दल उपस्थित महिलांनी आभार व्यक्त केले. न भूतो न भाविष्यती असे आमदार व महिला नेतृत्व लाभले या साठी त्यांनी देवाचे आभार मानले.
या प्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख विद्या ताई जगताप, मनमाड शहर प्रमुख संगीताताई बागुल, विधानसभा संघटक पूजा छाजेड, सरला गोगळ, नाजमा मिर्झा, सुरेखा ढाके, लक्ष्मी अहिरे, प्रतिभा अहिरे, संगीता सांगळे, नीता लोंढे आदि सह महिला आघाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयामध्ये मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा

मनमाड महाविद्यालयामध्ये मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा

मनमाड महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास...

read more
बघा व्हिडिओ – पांझण ( धोटाणे) येथील सुस्थितीतील शौचालय जमीनदोस्त; महीलवर्गात तीव्र संताप

बघा व्हिडिओ – पांझण ( धोटाणे) येथील सुस्थितीतील शौचालय जमीनदोस्त; महीलवर्गात तीव्र संताप

नांदगांव : मारुती जगधने पांझण (धोटाणे) ता नांदगाव येथील ग्रांमपंचायतीने गावातील महीलासाठी बांधलेले...

read more
देशाच्या आर्थिक प्रगतीत सहकार क्षेत्रातील बँकांची भूमिका महत्त्वाची:-डॉ. भारती पवार

देशाच्या आर्थिक प्रगतीत सहकार क्षेत्रातील बँकांची भूमिका महत्त्वाची:-डॉ. भारती पवार

महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक शिखर परिषद 2023 - 24 अँकर नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन...

read more
मा. तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे, महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन.

मा. तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे, महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन.

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, उमराणे संचलित, मा. तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

पौष मास संकष्ट चतुर्थी  निमित्त सोमवार दिनांक 29/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त सोमवार दिनांक 29/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
.