मनमाड : येथील मनमाड कोर्टाच्या बार रूम मध्ये गुरुवारी मनमाड बार असोसिएशनची निवडणुक होवून त्यात प्रसिद्ध ज्येष्ठ वकील किशोर एकनाथ सोनवणे यांची ४५ पैकी ३१ मते मिळवून बहुमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीत बार असोसिएशनच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४५ सदस्यांनी मतदान केले.
सचिवपदी ॲड. शशिकांत माधवराव व्यवहारे यांना २३ मते मिळाल्याने यांची बहुमताने निवड जाहिर करण्यात आली. सहसचिव पदी ॲड.मुरलीधर गणेश बापट यांना २६ मते मिळाल्याने त्यांची निवड झाली. खजिनदार पदासाठी झालेल्या मतदानात ॲड. संजय शांतीलाल गांधी व ॲड. वाल्मीक सुखदेव जगताप या दोघांनाही समसमान २२ मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी टाकून ॲड. संजय गांधी यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष पदासाठी ॲडव.सुरेश पी. पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. वळवी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲडव. अशोक लाठे यांनी काम पाहिले. नुतन कार्यकारिणीचे शहरांतील सर्व थरांतील नागरीकांनी अभिनंदन होत आहे. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे अभिनंदन

मुलींनी स्वतःच्या क्षमता ओळखणे महत्त्वाचे:- डॉ. स्वाती देवरे
८ मार्च (मनमाड) येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात...