loader image
[ays_poll id=7]

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करणार्यांना कडक शासन व्हावे – नांदगाव मनमाड पत्रकार संघाची मागणी

Feb 12, 2023


मनमाड : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्त्या करणाऱ्यांना कडक शासन व्हावे आणि पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशा आशयाचे निवेदन नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे मनमाड पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक प्रल्हाद गीते यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जात असतो. लोकशाहीच्या सरंक्षणासाठी निर्भीड पत्रकारितेची कायमच महत्वाची भुमिका राहिलेली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून देशभरात हुकूमशाही प्रवृत्ती या पत्रकारितेवर अंकुश ठेवू पहात आहेत.पत्रकारांवरील हल्ले आणि दबाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एखाद्या विषयाच्या दोन्ही बाजू मांडतांना जनहिताला सतत प्राधान्य देणे हे पत्रकार आणि पत्रकारितेचे कर्तव्यच आहे. अशीच पत्रकारिता करणारे राजापूर (ता. रत्नागिरी) येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. विरोधात बातमी दिली या रागातून शशिकांत वारिके यांना संपविण्यात आले आहे. हा पत्रकार आणि पत्रकारितेवर केलेला हल्लाच असून आम्ही सारे पत्रकार याचा तीव्र निषेध करीत आहोत.देशातील लोकशाहीचा गळा घोटणारा हा प्रकार असून या प्रकरणातील हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी आणि शशिकांत वारिके यांना न्याय मिळावा. तसेच पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी. जेणेकरून अशा घटनांना भविष्यात पायबंद बसेल. पत्रकारांच्या जीवीताचे आणि पर्यायाने पत्रकारितेचे संरक्षण व्हावे अशी मागणी आम्ही करीत आहोत. नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे, ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी, नरेश गुजराथी, निलेश वाघ, अशोक बिदरी, नरहरी उंबरे, सतीश शेकदार, उपाली परदेशी, योगेश मस्के, गणेश केदारे, नाना आहिरे, अफरोज अत्तार, तुषार गोयल, आनंद बोथरा, अनिस शेख आदींनी दिलेल्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.