loader image
[ays_poll id=7]

लासलगाव रेल्वे कर्मचारी अपघात – चालकासह तिघांना रेल्वेने केले निलंबीत

Feb 14, 2023

टॉवर वॅगनच्या धडकेने चौघे रेल्वे कर्मचारी चिरडले जावून ठार झाल्याची घटना मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ काल पहाटे घडली होती. या घटनेची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत अपघाताला कारणीभूत असलेल्या चालक आर.एन.पाटील यांच्यासह तिघांचे तत्काळ निलंबन केले असून रेल्वे बोर्डाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, रेल्वे चालक आर.एन.पाटील यांच्यासह कनिष्ठ अभियंता हेमंत ठाकूर यांना लासलगाव पोलिसांनी अटक केली आहे.

अपघाताची होणार उच्चस्तरीय चौकशी होणार असून
भुसावळ विभागीय स्तरावरील उच्चपदस्थ अधिकारी या अपघाताची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सोमवारी सकाळी सहा वाजता घडलेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे कर्मचार्‍यांनी रेल्वे रोको आंदोलन केल्यानंतर अनेक रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाला तर अप-डाऊन मार्गावर धावणार्‍या अनेक गाड्या तासभर उशिराने धावल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

दुर्घटनेची माहिती मिळताच डीआरएम एस.एस. केडीया, एडीआरएम सुनील कुमार सुमंत, डीसीएम अनिल पाठक यांच्यासह सर्व उच्च पदस्थ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी पाहणी केली. स्थानिक पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता.

अप-डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत
लासलगाव जवळ झालेल्या दुर्देवी घटनेनंतर रेल्वे कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली. भुसावळ स्थानकावरून सुटणार्‍या गाड्यामध्ये गोवा एक्स्प्रेस एक तास, मुंबई लखनऊ सुपरफास्ट, साकेंत एक्स्प्रेस, भागलपूर – एलटीटी एक्स्प्रेस व काशी एक्सप्रेस या गाड्या नियोजीत वेळेपेक्षा 30 मिनीटे ते एक तास विलंबाने धावल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. मुंबईकडून येणार्‍या काही गाड्या सुध्दा नियोजीत वेळेपेक्षा 20 ते 30 मिनीटे विलंबाने भुसावळकडे आल्यात तर अनेक स्थानकावर गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.

लासलगावजवळ घडलेल्या दुर्घटनेची रेल्वे बोर्डाकडून दखल घेण्यात आली असून या दुर्देवी घटनेची चौकशी भुसावळ विभागातील रेल्वेचे वरीष्ठ विभागातील अधिकारी करतील, अशी माहिती वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉ.शिवराज मानसपूरे यांनी दिली. रेल्वे कर्मचार्‍यांना चिरडणार्‍या रेल्वे चालकाला तत्काळ सेवेतून निलंबीत करण्यात आल्याचेही डॉ.मानसपूरे म्हणाले. उच्च पदस्थ अधिकार्‍यांकडून झालेल्या चौकशी अहवाल मध्य रेल्वेचे जीएम यांना सादर होऊन हा अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविला जाणार आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.