नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव तालुक्यातील पिंपरी हवेली येथे आज भल्या पहाटे बिबट्याने हल्ला करत पाच शेळ्यांना ठार केल्याने मोठी खळबळ उडाली असून,शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
पिंपरी हवेली येथील ज्ञानेश्वर देविदास वाघ यांच्या शेळ्या गोठ्यात बांधलेल्या होत्या.मध्यरात्री या ठिकाणी बिबट्याने हल्ला करून चार शेळ्यांना फक्त ठार केले तर एका शेळीचे मासं खाऊन पलायन केले.सकाळी या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे शिंदे व पशुवैद्यकीय विभागाचे डॉ.जाधव यांनी घटनास्थळ भेट दिली. या स्थळ पंचनामा व मृत शेळ्यांचे शव विच्छेदन करण्यात आले.सदर शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला असून,या शेतकऱ्याला आर्थिक मदत करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ बोरसे यांनी केली आहे.