loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रीय लोकअदालतीतून मनमाडला ३८० प्रकरणांचा निपटारा

Feb 15, 2023

येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २९७२ केसेसमधून ३८० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून त्यातून २५ लाख ४२ हजार ७९६ रुपयांची वसुली झाली आहे. अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश व रेल्वेचे मॅजिस्ट्रेट अनुपम मुक्कनवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या लोकन्यायालयात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दाखलपूर्व २ हजार ३६३ पैकी १६९ प्रकरणांचा निपटारा करण्यात येऊन त्यातून १० लाख ४९ हजार ५५८ रुपयांची वसुली झाली. तर दाखल झालेल्या ६०९ प्रकरणांपैकी २११ प्रकरणांचा निपटारा होऊन त्यातून १४ लाख ९३ हजार २३८ रुपये वसुल झाले. या सर्व प्रलंबित प्रकरणांमध्ये बँक व पतसंस्था रिकव्हरी, गुन्हेगारी, महावितरणची थकीत वीजबिले, मोटर अपघात, नगरपरिषदेच्या थकीत रकमा, बँकेचे परत आलेले धनादेश, अदखलपात्र गुन्हे, ग्रामपंचायतीबाबतची प्रकरणे आदी या राष्ट्रीय अदालतमध्ये निकालासाठी ठेवण्यात आली होती. मनमाड वकील संघाचे अध्यक्ष ॲड. किशोर सोनवणे, सचिव ऍड. शशिकांत व्यवहारे, ऍड. एम. जी. बापट, ऍड. संजय गांधी, ऍड. भास्कर निकम, ऍड. राजेंद्र पालवे, ऍड. दिलीप देसले, एड. राजेंद्र पांडे, ॲड. हेमंत सोनवणे, अॅड. शेखर महाजन, अॅड. मुनवर पठाण, ॲड. सुरेश मल्हारे, अॅड. योगेश बनकर व न्यायालय कर्मचारी वर्गाने या लोकअदालतीचे कामकाज यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

नितीन पांडे यांची भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदावर सलग चौथ्यादा नियुक्ती ❗झेप एका नव्या जबाबदारी ची

नितीन पांडे यांची भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदावर सलग चौथ्यादा नियुक्ती ❗झेप एका नव्या जबाबदारी ची

भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड, रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव व नेमिनाथ जैन गुरुकुल संस्थेचे केबी आबड मेडिकल कॉलेज चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड, रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव व नेमिनाथ जैन गुरुकुल संस्थेचे केबी आबड मेडिकल कॉलेज चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

चांदवड येथील श्री आर पी चोरडिया मेडिकल कॉलेज येथे लायन्स क्लब मनमाड प्राईड व रोटरी आय हॉस्पिटल...

read more
श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

मनमाड - सालाबादप्रमाणे 1986 पासून यंदा ही अखंडीत पणे सलग 38 व्या वर्षी श्रीराम मंदिर आठवडे बाजार...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन  यांच्या वरिष्ठ महिला आमंत्रिताच्या ( जिल्हास्तरीय ) टि-20...

read more
.