loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील विविध तांड्यांवर संत श्री सेवालाल जयंती साजरी – सौ. अंजुम कांदे यांची उपस्थिती

Feb 15, 2023


संत श्री सेवालाल महाराज जयंती निमित्त आज सौ.अंजुमताई कांदे यांनी विविध तांड्यांवर उपस्थित राहून संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्सवात सहभाग घेतला.
वसंत नगर तांडा तसेच ढेकू तांडा येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
ढेकू सेवागड तांडा येथील आई जगदंबा माता व संत सेवालाल महाराज मंदिर प्रांगणात आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्सव प्रसंगी त्या उपस्थित होत्या.
याप्रसंगी बोलताना अंजुम ताईंनी बंजारा समाजातील मुलींना शिक्षणात प्रेरणा मिळावी म्हणून बारावी च्या परीक्षेत पहिल्या तीन मध्ये येणाऱ्या मुलींना भविष्यातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार असल्याचे जाहीर केले. बंजारा समाजाप्रती नेहमीच आमदार सुहास अण्णा कांदे व आम्हा सर्व कुटुंबीयांना प्रेम आहे आणि यापुढेही राहणार, तसेचआपल्या मुलींना जास्तीत जास्त शिक्षण द्या असेही आवाहन त्यांनी केले.
बंजारा समाजातील तरुण मोठ्या संख्येने भारतीय सेनेत सेवा देत असून त्यातील काही जवान या ठिकाणी उपस्थित होते, या सर्वांचे ताईंच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला.कुमारी गायत्री सुनील चव्हाण या विद्यार्थिनीने उत्कृष्ट भाषण केले, ताईंनी तिचा सत्कार करत तिला 501 रुपयांचे बक्षीस या वेळी दिले.
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख विद्याताई जगताप मनमाड शहर प्रमुख संगीता ताई बागुल नांदगाव शहर प्रमुख रोहिणी ताई मोरे, एन के राठोड, कांतीलाल चव्हाण, खूपचंद चव्हाण, भोपालाल राठोड गोरख चव्हाण, ढेकू ग्रामपंचायत सरपंच, उप सरपंच सदस्य आदींसह मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव मात्र भगिनी उपस्थित होत्या.


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
.