loader image

चांदवड तलाठी कार्यालयातील खाजगी मदतनीस एसीबी च्या जाळ्यात

Feb 16, 2023


चांदवड – चांदवड येथील तलाठी कार्यालयातील खाजगी कामगार मदतनीस रवींद्र कारभारी मोरे, वय ४२ राहणार पाठरशेंबे याला लाच घेताना पकडण्यात आले आहे. मोरे हा चांदवडच्या तलाठी कार्यालयात खाजगी कामगार मदतनीस म्हणून कार्यरत आहे.

अँटी करप्शन ब्युरो (एसीबी)ने दिलेल्या माहितीनुसार, कांदा खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या वडिलांच्या नावे ५० गुंठे जमीन विकत घेतली होती. गाव नमुना ७/ गट क्रमांक ४०९ अन्वये सदरील सातबारा उताऱ्यावर नाव लावायचे होते. यामोबदल्यात हॉटेलमध्ये पार्टी केल्याचे बिलाची रक्कम २९४० रुपये बक्षिस स्वरूपात लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती.

सापळा अधिकारी संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक, पो. हवा. एकनाथ बाविस्कर, पो. ना. प्रकाश महाजन, पो. शि. नितीन नेटारे, चा. पो. शि. परशुराम जाधव यांचा पथकामध्ये समावेश होता. पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे आणि पोलीस उपअधीक्षक
नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, एसीबीने आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे एसीबीने म्हटले आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.