loader image
[ays_poll id=7]

कवी रवींद्रनाथ टागोर शाळेत फनफेअर साजरा

Feb 16, 2023


मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘फनफेअर’ या विदयार्थीप्रिय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाचे यजमानपद इयत्ता ७ वी ते ९ वीच्या वर्गाला देण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. प्रविण शिंगी आणि डॉ. मनिषा शिंगी यांच्या हस्ते फित कापून झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. प्रविण शिंगी आणि डॉ. मनिषा शिंगी यांचा सन्मानचिन्ह, शाल आणि भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या उपक्रमशिलतेला आणि व्यावसायिक गुणांना वाव मिळावा यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर सर यांनी आपल्या प्रास्ताविकात नमुद केले. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. प्रविण शिंगी आणि डॉ. मनिषा शिंगी यांचा परिचय सौ. अनिता शाकाव्दिपी यांनी केला.
याप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे, संस्थेचे श्री. वैभव कुलकर्णी, श्री. धनंजय निंभोरकर आणि श्री. ज्ञानेश्वर माळी हे उपस्थित होते.
शाळेच्या प्रांगणात भव्य अश्या मंडपात विदयाथ्र्यांकडून खादयपदाथांची 30 तर खेळाची 20 अशी विविध 50 स्टॉल लावण्यात आली होते. सकाळी ०८.०० ते दु. १२.३० पर्यंत आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांनी मनसोक्त आनंद लुटला.
पाणीपुरी, गिली भेळ, दाबेली, बदाम शेक, बटाटावडा, पावभाजी, गुलाबजाम, मठ्ठा, बटाटा सॅन्डविच, पापडीचाट, मुंगभजी, मसाला पापड, पाकातली पुरी, चायनीज भेळ, सॅन्डविच केक, कोको ड्रिंक, समोसा, कचोरी, ज्युस, नुडल्स, चहा, मिसळपाव, चनामसाला, शेवपूरी, पापडचाट, फिंगरबेल अशा विविध खाद्यपदार्थांसोबतच मॅजिक बॉल, शुट द ग्लास, थ्रो द रिंग, शुट द बलून, प्ले विथ स्टोन, फिक्स द कार्ड, लक द स्पिन्ज, गेमबॉल्स इ. करमणुकीच्या खेळांनी विदयार्थी तसेच पालकांच्या मनोरंजनात भर टाकली. विविध प्रकारचे खेळ व घरगुती खादयपदार्थ माफक दरामध्ये विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून दिले.
असंख्य पालकांनी हितचिंतकांनी कार्यक्रमास भेट देवून शुभेच्छा दिल्या व समाधान व्यक्त केले.
फन फेअर कमिटीतील सौ. संगिता कदम-देसले व कु. अमिता झाडे या शिक्षकांसह इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे शाळेच्या वतीने कार्यक्रम आयोजनासाठी सहकार्य लाभले. तर श्री. मनोज छाबडा, श्री. तुषार चौधरी, श्री. ज्ञानेश्वर माळी, डॉ. प्रदिप साळी यांचे संस्थेच्यावतीने उपक्रमास मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन सौ. तेजस्विनी चांदेकर यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.