मनमाड आणि नांदगाव येथील आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालयात निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले.
आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या उपस्थितीत मध्यवर्ती संपर्क कार्यालय मनमाड येथे शिवसेना पक्ष व धनुष्यबाणचिन्ह मिळाल्याचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
ढोल ताशांचा गजरात ठेका धरत, फटाक्यांच्या आतिषबाजीत पेढे वाटत आमदार सुहास आण्णा कांदे व शिवसैनिकांनी आनंद साजरा केला.
यावेळी उपस्थित सर्व शिवसेना, युवा सेना व महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी आमदार सुहास अण्णा कांदे तसेच कांदे यांचे अभिनंदन केले.