loader image
[ays_poll id=7]

भूमी क्रिकेट संघाचा चाळीसगाव क्रिकेट संघावर विजय – रुषी शर्मा सामनावीर

Feb 18, 2023

शनिवार दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी भूमी क्रिकेट अकॅडमी मनमाड विरुध्द चाळीसगाव क्रिकेट अकॅडमी या संघामध्ये झालेल्या सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी संघाने आठ बळी राखुन विजय प्राप्त केला. ४० षटकांच्या या सामन्यामध्ये चाळीसगाव संघाने नाणेफेक जिंकुन फलंदाजी करण्याचे ठरवले. चाळीसगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना १८ षटकात १० बळी गमवुन फक्त १०२ धावा केल्या. ज्यात मनमाड संघातील रुषी शर्मा या गोलंदाजाने ५ बळी मिळविले. अभिजीतने ३ तर चिराग निफाडकर व ओम फासळे यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला. या धावांचा पाठलाग करत असताना मनमाड संघाने ८.५ षटकातच २ बळी गमवुन ह्या सामण्यात एक सहज विजय प्राप्त केला. मनमाड संघाच्या फलंदाजीत रोहित पवार नाबाद 38 धावा व हसन शेख यानी ही नाबाद 34 धावा फटकाविल्या. ५ षटकात गोलंदाजीत 12 धावा देऊन ५ बळी टिपणारा रुषी शर्मा सर्वोत्कृष्ठ गोलंदाज या सामण्याचा सामनावीर ठरला.

भूमी क्रिकेट अकॅडमी, मनमाड चे संचालक व कोच सिध्दार्थ ( भोला ) रोकडे व वाल्मिक रोकडे यांनी या सामण्याचे आयोजन महर्षी भगवान वाल्मिकी स्टेडियम मनमाड येथे केले.

अकॅडमीचे चे मार्गदर्शक श्री. ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक , हबीब शेख , सिद्धार्थ बरडीया , परवेज शेख , कौशल शर्मा , तय्यब शेख , शुभम ( बापु ) गायकवाड , शुभम बिडगर रोहित पवार यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान भाई मोमीन यांनी खेळाडुंना पुढिल सामण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

कंचन ज्वेलर्स आयोजित दिवाळी – नाताळ ऑफर योजनेची सोडत शेकडो ग्राहकांच्या साक्षीने संपन्न

कंचन ज्वेलर्स आयोजित दिवाळी – नाताळ ऑफर योजनेची सोडत शेकडो ग्राहकांच्या साक्षीने संपन्न

मनमाड शहरात सुमारे सात दशकांपासून शुद्धता आणि विश्वासाची परंपरा अबाधित राखत ग्राहकांच्या पसंतीस...

read more
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच मध्य रेल्वे झोनल कमिटीने घेतली ना.रामदास आठवले यांची भेट

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच मध्य रेल्वे झोनल कमिटीने घेतली ना.रामदास आठवले यांची भेट

ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोशियशन मध्य रेल्वे झोनल कमीटी तर्फे केंद्रीय मंत्री रामदास...

read more
चाचा नेहरू बालमहोत्सवामुळे मिळाला बालकांच्या विविध कलागुणांना वाव! -चंद्रशेखर पगारे विभागीय उप आयुक्त महिला व बाल विकास नाशिक

चाचा नेहरू बालमहोत्सवामुळे मिळाला बालकांच्या विविध कलागुणांना वाव! -चंद्रशेखर पगारे विभागीय उप आयुक्त महिला व बाल विकास नाशिक

नाशिक- महिला व बालविकास विभाग,महाराष्ट्र शासन व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक...

read more
बघा व्हिडिओ – वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून पडुन विद्यार्थ्याचा मृत्यू

बघा व्हिडिओ – वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून पडुन विद्यार्थ्याचा मृत्यू

सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून खाली पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना कोटा राजस्थान येथे...

read more
.