loader image
[ays_poll id=7]

के.आर. टी शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

Feb 18, 2023


के आर टी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये केजी विभागात शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर,उपप्राचार्य वैभव कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यावेळी विश्वस्त धनंजय निंभोरकर, मुख्याध्यापक दिपक व्यवहारे उपस्थित होते.के जी विभागातील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत नर्सरी चा देवांश देवडे,मावळे काव्या बरडे,लकी पवार,जिजाबाई अमिंती उबाळे, खूप छान प्रकारे तयार होऊन आलेले होते.त्यानंतर शाळेचे प्राचार्य मिसर यांनी शिवरायांबद्दल माहिती सांगितली. केआर टी च्या प्रांगणात विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. खूप मोठ्या उत्साहात विद्यार्थी जल्लोषाने नृत्य करीत रॅलीत चालत होते. महाराजांच्या मूर्ती बरोबर एक किल्ला देखील ठेवण्यात आला होता.किल्ला रसाळ मॅडम यांनी बनवला होता. सीनियर च्या ज्ञानराज थोरे,प्रसन्न पाटील,आरव नेरकर,चिमुकल्या दिव्या जगताप, श्रेया पाटील,राजमाता जिजाऊ समयक मालपाणी,यांनी भाषणे सादर केले.ज्युनियर चे वेदांत म्हात्रे,हिमांशी म्हसदे,प्रितेश पितृभक्त,प्रांजल हादगे,प्रितम देवगिर. ह्या विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रकट केले.कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी.सौ क्षीरसागर,सौ शाकाद्वीपि,सौ खैरे,श्रीमती मिश्रा, श्री झालटे सर, कुमारी भारती पवार, सौ रसाळ,सौ लहाने,इतर शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सुञसंचालन राजश्री बनकर यांनी केले.

 


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.