loader image
[ays_poll id=7]

खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेत मनमाडच्या वीणाताई आहेर चा नवीन राष्ट्रीय विक्रम

Feb 19, 2023


आज बिहार पटना येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रिय वेटलिफ्टिंग स्पर्धेत वीणाताई संतोष आहेर हिने नवीन राष्ट्रीय विक्रमासह ४० किलो वजनी गटात सुवर्णपदक व रोख दहा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. ५४ किलो स्नॅच व ७३ किलो क्लिन जर्क एकूण १२७ किलो वजन उचलून विक्रमी कामगिरी केली.
नुकत्याच इंदोर येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये विनाताई ने क्लिन जर्कचा स्वतःचाच ७२ किलो चा रेकॉर्ड मोडीत काढत आज ७३ किलो चा नवीन राष्ट्रिय विक्रम प्रस्थापित करीत सर्वांची वाहवा मिळविली.
गेल्या जवळपास तीन वर्षांपासून जय भवानी व्यायामशाळा मनमाड चे खेळाडू छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शनाने सातत्त्याने राष्ट्रिय स्तरावर नवनविन विक्रम स्थापन करीत आहेत. आकांक्षा व्यवहारे मुकुंद आहेर व आता विनाताई आहेर,विनाताई सध्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाड येथे इ १२ वी त शिकत आहे.
४५ किलो ज्युनियर वजनी गटात वीणाची लहान बहीण व छत्रे विद्यालयाची खेळाडू मेघा संतोष आहेर हिने ५६ किलो स्नॅच ७९ किलो क्लिन जर्क असे १३५ किलो वजन उचलून चवथा क्रमांक व रोख सहा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावून आपल्या पहिल्याच खेलो इंडिया राष्ट्रिय स्पर्धेत उत्तम कामगिरी केली.

 

यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ सुनील बागरेचा, प्रा दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर,अध्यक्ष पी जे दिंडोरकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका सौ पोतदार, एस एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील, क्रीडा संचालक प्रा संतोष जाधव, महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने, सचिव प्रमोद चोळकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. मनमाड ठिणगी तर्फे अभिनंदन आणि शुभेच्छा


अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
.