loader image
[ays_poll id=7]

मनमाडला बुधवार पासून रंगणार कबड्डी सामने

Feb 20, 2023

कबड्डीची पंढरी असलेल्या मनमाड शहरात बुधवार दिनांक २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान मनमाड कबड्डी लीग स्पर्धेचा दुसरा हंगाम आयोजित करण्यात आला आहे. खेळाडूंमध्ये एकूण १९ सामने एकाच मैदानावर सात दिवस होणार आहेत. यासाठी सहा संघांची निवड करण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र पगारे, प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जय भवानी व्यायाम शाळेच्या हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह सतीश सूर्यवंशी, सदस्य वाल्मिक बागुल, पंच प्रमुख राजेंद्र निकुंभ, सुधाकर कातकडे, रमेश केदारे उपस्थित होते. यावर्षी पंकज खताळ यांच्या सहकार्याने आजी-माजी खेळाडू व नाशिक जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड कबड्डी लीग स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाचे आयोजन येत्या २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुलावर सायंकाळी ६ ते ९ दरम्यान हे सामने खेळविले जाणार आहेत. एकाच मैदानावर दररोज फक्त तीन सामने खेळविले जाणार आहेत. दि.२२ रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. यात सहा संघ आणि सहा प्रशिक्षक आहेत. एकूण ९८ खेळाडूंमध्ये १९ सामने सात दिवस होणार आहेत. या लीग स्पर्धेसाठी २१-२१ दिवसांची दोन शिबिरे घेऊन त्यातून खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. खेळण्याच्या जागेनुसार व कौशल्यानुसार या खेळाडूंची सहा संघांत विभागणी करण्यात आली. सर्व संघ तुल्यबळ व्हावेत, यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे.

पापा थॉमस, जयकुमार फुलवानी, अरबाज काजी, सागर गरूड, विजय बेदाडे व प्रमोद गांगुर्डे, बाळा सांगळे हे सहा संघमालक आहेत. या स्पर्धेसाठी १५ हजार रुपयांचे पहिले बक्षीस रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आहिरे, ११ हजारांचे दुसरे बक्षीस आकाश वाघमारे, ७ हजारांचे तिसरे बक्षीस अन्वर पठाण, तर ५ हजारांचे चौथे बक्षीस लियाकत शेख यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

प्रत्येक सामन्यातील सामनावीराला वैयक्तिक बक्षीस दिले जाणार आहे. यावेळी आयोजन प्रमुख रमेश केदारे, बंटी सोनवणे, भूषण दरगुडे, प्रसाद दरगुडे, आयण शेख, समीर शेख, मयूर बनसोडे, निर्माण मोरे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

दि सेंट्रल रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड सार्वत्रिक निवडणूकीत प्रगती पॅनल विजयी

दि सेंट्रल रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड सार्वत्रिक निवडणूकीत प्रगती पॅनल विजयी

दि सेन्ट्रल रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड २०२३-२४ सार्वत्रिक निवडणुकीत ऑल इंडिया एससी एसटी...

read more
महाविद्यालयात भारतीय संविधानाच्या एक-एक कलमाचे रोज वाचन व्हावे : शरद शेजवळ अध्यापकभारतीची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

महाविद्यालयात भारतीय संविधानाच्या एक-एक कलमाचे रोज वाचन व्हावे : शरद शेजवळ अध्यापकभारतीची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

येवला (प्रतिनिधी) भारतीयांचा धर्मग्रंथ भारतीय संविधानाची ओळख,महत्व,हक्क अधिकारा बरोबरच कर्तव्य...

read more
सौ. क. मा. कासलीवाल शाळेच्या मुख्याध्यापकाच्या मनमानी कारभारा विरोधात सुरू असलेले उपोषण लेखी आश्वसनानंतर अखेर मागे

सौ. क. मा. कासलीवाल शाळेच्या मुख्याध्यापकाच्या मनमानी कारभारा विरोधात सुरू असलेले उपोषण लेखी आश्वसनानंतर अखेर मागे

नांदगाव - (सोमनाथ घोंगाणे) नांदगाव तालुक्यातील कोणतेही काम असो ते उपोषण, आंदोलन, मोर्चा या शिवाय...

read more
स्वच्छ मनमाड आणि प्लास्टिक पुनर्वापर योजना – विकास दादा काकडेंचे मनमाडकरांना आवाहन

स्वच्छ मनमाड आणि प्लास्टिक पुनर्वापर योजना – विकास दादा काकडेंचे मनमाडकरांना आवाहन

स्वच्छ मनमाड आणि प्लास्टिक पुनर्वापर योजनेअंतर्गत गेल्या दीड दोन वर्षांपासून आपण काम करीत आहोत या...

read more
जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे व तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिमोग्लोबिन तपासणी शिबीर

जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे व तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिमोग्लोबिन तपासणी शिबीर

उमराणे ;- जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे व तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य व...

read more
आर.ए.चषक 2023 मनमाड क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना विजेता एस.ए.चॅलेंजर संघ व उपविजेता स्पीड क्रिकेट संघ

आर.ए.चषक 2023 मनमाड क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना विजेता एस.ए.चॅलेंजर संघ व उपविजेता स्पीड क्रिकेट संघ

मनमाड :- सनी क्रिकेट क्लब,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण मनमाड येथे...

read more
.