loader image
[ays_poll id=7]

शाहीर सुरेशचंद्र आहेर यांच्या घुंगरू सुटलं र कथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

Feb 21, 2023


दि. 19 फेब्रुवारी 2023 शिवजयंतीदिनी परशुराम नाट्यगृह शालिमार येथे माननीय शाहीर सुरेशचंद्र आहेर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या लेखणीतून व अनुभवातून साकारलेल्या घुंगरू सुटलं र  या कथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.गं.पां.माने हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.ना. बबनराव घोलप, श्री मधुकर झेंडे, श्री श्रीकांत वेणी, श्री संजय पाठक, श्री दत्तात्रेय गोतिसे, श्री सुभाषचंद्र आहेर, श्री राजेश जाधव, श्री राजाभाऊ आहेर, श्री प्रकाश आहीरे ,मनमाड क्रांती परिवाराच्या  वतीने  श्री . विशाल मोरे ,श्री .राजेश सोनवणे,श्री .मिलिंद वाघ,चंद्रकांत ठाकरे, रविराज कासवे , उपस्थित होते. सा .मनमाड क्रांतीच्या वतीने शाहीर सुरेशचंद्र आहेर यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी मा.ना.बबनराव घोलप यांनी कलावंतांच्या संघर्षमय जीवनाचे येणाऱ्या व्यथा  मांडल्या या कार्यक्रमात अनेक मान्यवर प्रतिष्ठित कलाकार, कवी, लेखक, साहित्यिक, गीतकार, संगीतकार नाटककार, उपस्थित होते  . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री प्रमोद आहेर, श्री प्रसाद अंतरवेलीकर, श्री मनोज आहेर यांनी परीश्रम घेतले. सुत्र संचालन श्री अशोक भालेराव यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  माजी समाज कल्याण मंत्री माननीय बबनरावजी घोलप नाना हे उपस्थित होते .या वेळी .मा. ना. बबनराव (नाना) घोलप मा. श्री. गं. पां. माने ,मा.श्री. मधुकर (आण्णा) झेंडे , मा. श्री. प्रा. शंकर बो-हाडे ,मा.श्री.भगवान हिरे (नाट्य लेखक) मा. श्री. श्रीकांत गजाभाऊ बेणी, मा.श्री. विशाल मोरे,मा.श्री. सुभाषचंद्र सं. आहेर, मा.श्री.अशोक रा. भालेराव, मा.श्री.हि. रा. नांदगावकर ,मा. शाहीर दिनकर रा. शेजवळ, मा.श्री.वसंतराव वाघ ,मा.श्री. माधव शेजवळ (बौध्दाचार्य) ,मा. श्री. शाम ध. जाधव, मा.श्री. विजयकुमार इंगळे, मा.श्री. शाहिर प्रकाश नन्नावरे ,मा.श्री.राजेश जाधव,मा.श्री.प्रा. गंगाधर आहीरेमा.श्री.कवी/लेखक. अनिल मनोहर,मा. शाहीर प्रसाद अंतरवेलीकर,मा. शाहीर पंडितराव रिकामे,मा.श्री.मास्टर रज्जाक शेख,मा.श्री.शंकरराव दाभाडे,मा.श्री. आनंद केदारे,मा.श्री. दादासाहेब धाटे,मा.श्री.प्रदीप वाडेकर,मा.श्री.संजय पाठक (लोकमत),मा.श्री.भदुराज बाघ  आदी  मान्यवरांचे सन्मानचिन्ह देऊन  सत्कार  करण्यात आले काही  जेष्ठानी आपले मनोगत देखील व्यक्त केले. व आपल्या भूतकाळातील अनुभव या प्रसंगी  रविराज कासवे यांनी आपले मत व्यक्त करताना … घुंगरू सुटलं र
शब्द वाक्य खुप छोटंसं आहे पण अर्थ शोधला तर त्या कलाकाराचे संपूर्ण आयुष्य ह्यामध्ये दडलेले आहे. एक कलाकार म्हणून त्याला अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. संपूर्ण आयुष्य पायात घुंगरू बांधून कला सादर करणे व संपूर्ण तरुणाई त्या कलेसाठी खर्च करणे. मुळात कलाकार त्या कलेमध्ये जणू वेडाच असतो. एक प्रकारची नशा असते. जीचा प्रभाव असल्यास कलाकार कीतीही मोठें दुःख आले तरी पचविण्याची क्षमता ठेवतो. पण त्याच कलाकारासाठी सर्वात मोठं दुःख म्हणजे आयुष्य कलेसाठी वाया घालवूनी जेव्हा अशी वेळ येते की तो आता कला सादर करु शकत नाही.तेंव्हा त्याचं मन हृदय धड सामान्य जगू ही शकत नाही किंव्हा मरू ही शकत नाही. त्याच मन अजूनही त्या कलेसाठी कासावीस होत. जणू त्याच सर्वस्व संपल. तो ते दुःख कुणाला सांगू ही शकत नाही. व त्याचे दुःख पचवू ही शकत नाही. कधी कोणत्या वृध्द कलाकारांशी अनुभव प्रसंग एकूण बघा, त्याच्या मनातील वेदना ओठावर येतात. तेंव्हा त्याचे हावभाव देखील बदलतात. तो स्वतः ला विसरून जातो. त्याला बोलतांना शब्द अपुरे करतात. जणू काही तो त्याच्या वेगळ्याच दुनियेत आहे. व जेव्हा बोलतांना त्याच्या लक्षात येते की अरे हे सर्व तर माझ्यापासून केव्हाच दूर झालं आहे. तेंव्हा त्याच्या मनातील वेदनेने त्याचा जिवंतपणीच खून केलेला असतो.एकच इच्छा व्यक्त करतो की कलाकाराच घुंगरू सुटनं हे त्याच्या मनाविरुध्द नसावं. त्याला संपुर्ण यश मिळेपर्यंत, त्याच ध्येय गाठेपर्यंत त्याला त्याच्या कलेपासून विभक्त नका होऊ देऊ. अन्यथा त्याच मरणापलिकडील वेदना,पिडा त्याच जीवन हे नर्क करून टाकते.अशी कैफियत मांडली .


अजून बातम्या वाचा..

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
.