loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात जागतिक सामाजिक न्याय दिवस साजरा

Feb 21, 2023


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाड येथे दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी जागतिक सामाजिक न्याय दिवस महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉक्टर ए. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती फरिदा मिठाईवाला उपस्थित होत्या. त्यांनी याप्रसंगी सामाजिक न्याय दिवस का साजरा करावयाचा असतो याची कारणे विशद केली त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी सदैव प्रयत्न करावे असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी आपले न्याय हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न करावे व त्यासाठी असणारे कायदे याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जी. एल. शेंडगे यांनी सामाजिक विषमता कुठल्या पद्धतीने दूर करता येईल याविषयीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले व समाज प्रगती पथावर नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव अग्रेसर राहावे असे आवाहन केले.
महाविद्यालयाच्या महिला विकास समिती व IQAC द्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्व प्राध्यापक बंधू भगिनी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.