राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे मनमाड शहराध्यक्ष सादिक रशिद पठाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.पत्रकात म्हटले आहे की मनमाड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पदाची यशस्वी जबाबदार पार पाडली असून माझ्या काळात अनेक समाजउपयोगी कामे केली तसेच युवक कॉंग्रेस पक्षामध्ये अनेक सदस्य जोडले व पक्षाचा नावलौकीक वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिलो. सध्या नांदगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कलाटणी लागली असून याची पक्षाला अनेक नामवंत व्यक्तींनी सोडचिठ्ठी दिली आहे याबाबत पक्षाने कोणतीही दखल घेतली नाही व पक्ष संघटनेबाबत काही एक कार्यवाही केलेली नाही, कळविलेले नाही त्यामुळे माझ्या सारखे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या पुढील कोणत्याही ध्येयधोरणाची कल्पनेने आम्ही संभ्रमात असून आमचा संग्रभ दूर झाला नाही त्यामुळे पक्षात आमचे स्थान राहिले नसल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे त्यामुळे मी मनमाड शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष पदाचा व सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. असे ह्या पत्रात पठाण यांनी नमूद केले आहे.
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...








