loader image
[ays_poll id=7]

नांदगाव आगाराची बस बंद पडल्याने विवाहाचा मुहर्त टळला

Feb 24, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव आगारातील नादुरुस्त भंगार एस . टी . बस रस्त्यामध्ये बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत असून, कित्येक लांंब पल्ल्याच्या बसेस रद्द करण्यात येत आहेत. परंतु भंगार बसेसचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून, भंगार बसेस तातडीने बदलून देण्यात याव्या अशी मागणी होत असताना अनेक बसेस अजूनही बंद पडलेल्या बघायला मिळत आहेत. अचानक बंद पडलेल्या बसेसच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. 

आज दि.23  रोजी मालेगांव चौफुली येथे मालेगांव-नांदगाव बस सकाळी११ वाजेच्या सुमारास तर त्यावेळेस हिगणवाडी येथे खडीक्रेशर जवळ  औरंगाबाद-मालेगांव बस  नादुरुस्त झाली असल्याने नागरिकांचा खोळंबा झाला.त्यानंतर नांदगाव येथील सतीष बिडवे यांच्या मुलाचे लग्न संभाजी नगर जिल्ह्यातील  फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथे गुरुवारी दुपारच्या मुहूर्तावर ठरलेले असल्याने त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या नांदगाव आगाराची बस प्रासंगिक कराराने भाडे तत्वावर बुक केली होती. कार्यालयाकडून चालकाला चुकीचा पत्ता दिल्याने बस नांदगाव ऐवजी नस्तनपूर येथे गेली त्यामुळे बस एक तास नियोजित वेळेपेक्षा उशिरा आली. नांदगाव येथूनच निघण्यास उशिरा झाला. साधारण पन्नास किमी अंतर गेल्यावर बस रस्त्यातच बंद पडली .सुमारे दोन तास उलटूनही पर्यायी बसची व्यवस्था करण्यात आलेली नाही त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नांदगाव आगाराच्या गलथान कारभारामुळे लग्नाचा मुहूर्त चुकण्याची वेळ बिडवे परिवारावर आली.
प्रवाशांची लालपरी हे बिरूद मिरवणारी एस . टी . आता जर्जर झालीय . ना चांगले टायर्स , ना वेळेवर मेन्टनन्स यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी असणारी एस टी रस्त्यात कधी बंद पडेल याची शाश्वती नाही. याही अवस्थेत काही प्रामाणीक वाहक चालक प्रवाशांना सेवा पुरवीत आहे . मात्र कधी काय होईल याचा नेम नाही.
याचा कळस म्हणून की काय बुधवार रोजी एका वादग्रस्त वाहकाने वाखारी येथील किसान माध्यमीक विद्यालयाच्या विद्यार्थीनीना डोक्यात तिकीट फाडण्याचे मशीन मारल्याने व अरेरावी केल्याने विद्यार्थी / विद्यार्थीनीनी आपल्या पालकासोबत व शिक्षकासोबत येत नांदगाव पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली असता सदर वाहकाला त्याच्या वरीष्ट अधिकाऱ्यां समोर पी. एस . आय सुरवाडकर यांनी चांगल्या प्रकारे समज दिली. शेवटी वाहकाने माफी मागितल्याने या प्रकारा वर पडदा टाकण्यात आला .

 .त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. बस कधीही आणि कोणत्याही ठिकाणी बंद पडणे ही नित्याची बाब झाली आहे. वाहने रस्त्यावर आणण्यापुर्वी त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. महामंडळ प्रशासन याकडे लक्ष देणार की मोठी दुर्घटना घडल्यावर त्यांना जाग येणार? असा असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.

नांदगाव आगारातील नादुरुस्त बसच्या माध्यमातून एसटीची प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांच्या या धोकादायक प्रवासाला जबाबदार कोण? एसटी बसच्या अपघात झाला तर  जबाबदार कोण? एसटी का करतेय प्रवाशांच्या जिवाशी खेळ? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे एसटीची ही परिस्थिती बदलण्यासाठी आता सरकार पातळीवरून प्रयत्न होणे गरजेच आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.