Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात संत गाडगे महाराज जयंती निमित्त स्वच्छता अभियान

Feb 25, 2023

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे संत गाडगे महाराज यांची जयंती निमित्त स्वच्छता व अभिवादन करून साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस कार्यक्रमाधिकारी डॉ. पवन सिंग परदेशी यांच्या नेतृत्वात एन एस एस स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसरातील झाडांना आळे करून रोझ गार्डन ची स्वच्छता केली. त्यानंतर संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गजानन शेंडगे यांनी केले. महेश महाले या एन एस एस स्वयंसेवकाने आपल्या मनोगतातून व्यक्त करताना सांगितले की, छत्रपती शिवरायांनी या समाजामध्ये पराक्रम शौर्याच्या जोरावर स्वराज्य निर्माण केले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानपूर्ण लेखणीच्या माध्यमातून संविधान निर्माण केले. तर संत गाडगे महाराजांनी समाजातील अज्ञान,भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा इत्यादी दोषांवर स्वच्छता, कीर्तनांद्वारे कठोर प्रहार केले व लोकजागृती केले.संत गाडगेबाबा कुठल्याही शाळा-कॉलेजात गेले नव्हते पण संत तुकाराम महाराजांचे अभंग त्यांचे तोंडपाठ होते. गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील समाजवादाचे एक प्रचंड व्यासपीठ होते. समाजातील अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लोक शिक्षणाचा वसा घेतला इत्यादी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पवनसिंग परदेशी यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या प्रा. ज्योती पालवे,कुलसचिव समाधान केदारे, तसेच प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, एनएसएस स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना व प्रसिद्धी विभागातर्फे करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी घालता येणार नाही, पण दिवसभरही फोडता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी घालता येणार नाही, पण दिवसभरही फोडता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

आगामी दिवाळीच्या काळात फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या वापराबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]