मनमाड:- इ.१० वी परीक्षा मार्च २०२३ केंद्र क्रमांक १३७६ एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड या केंद्रात एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड, मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मनमाड, इकरा गर्ल्स उर्दू हायस्कूल,मनमाड श्री, गुरू गोबिंद सिंग हायस्कूल,मनमाड या
माध्यमिक शाळेतील विदयार्थी मंडळाच्या होणाऱ्या इ.१० वी परीक्षेत मराठी माध्यम D061790 ते DO62158, इंग्रजी माध्यम D061995 ते D062159,उर्दू माध्यम D062066 ते D062154 असे एकूण 370 विदयार्थी प्रविष्ट होणार आहेत. संबंधीत विद्यार्थी व पालकांना दिनांक २८/०२/२०२३ वार बुधवार रोजी दुपारी १:०० ते ३:०० या वेळेत एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड येथे आसनव्यवस्था पाहता येणार आहे. सदर परीक्षेत प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यांनी परीक्षा कालावधीत पहिल्या दिवशी दिनांक ०२/०३/२०२३ गुरुवार रोजी सकाळी १०:०० वाजता व इतर दिवशी सकाळी १०:३० वाजता परीक्षा दालनात हजर रहावे.सकाळी १०:३० वाजेनंतर उशिरा येणा-या विद्यार्थ्यांना परीक्षा दालनात प्रवेश दिला जाणार नाही.विद्यार्थ्यांनी परीक्षेस येतांना सोबत फक्त स्वतःचे परीक्षा प्रवेशपत्र व लेखन साहित्य आणावे.कोणताही मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरण,वही,पुस्तक किंवा परीक्षेत गैरप्रकार करण्याच्या हेतुने कोणतेही साहित्य सोबत आणू नये. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग,शासन परिपत्रक क्रमांक: संकिर्ण – ०२२३/प्र.क्र.१२,एस. डी.२, दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ च्या परिपत्रकानुसार
कॉपीमुक्त अभियान अंमलबजावणी केली जाईल. अशा सुचना केंद्र क्रमांक १३७६ चे केंद्रसंचालक श्री.भूषण दशरथ शेवाळे यांनी केलेल्या आहे.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.
मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...