loader image
[ays_poll id=7]

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघ आयोजित ‘मातीचे-गड किल्ले बनविने’ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न…

Feb 27, 2023


मनमाड : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन भारत पेट्रोलयम इंधन कंपनीचे मुख्य प्रबंधक प्रशांत खर्गे यांनी येथे केले.

तरुण वर्गात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी इतिहासाबद्दल जागृती व्हावी तसेच टिव्ही, मोबाईल मध्ये गुंतलेल्या तरुण पिढीला मातीशी जोडण्यासाठी, नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने शिवयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ऐतिहासिक गड – किल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आययूडीपी येथील महात्मा फुले वाचनालय आणि अभ्यासिका येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे तर प्रमुख पाहुणे म्हणून भारत पेट्रोलयम कंपनीचे मुख्य प्रबंधक प्रशांत खर्गे, मार्गदर्शक  अशोक परदेशी, मार्गदर्शक नरेश गुजराथी, मार्गदर्शक सतीश शेकदार, सह सरचिटणीस संजय मोरे, सल्लागार  नरहरी उंबरे, सल्लागार संदीप देशपांडे, उपाध्यक्ष सोमनाथ घोंगाणे, कार्याध्यक्ष अनिल आव्हाड, मार्गदर्शक सतीश शेकदार उपस्थित होते. महापुरषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात  झाली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष अमोल खरे म्हणाले की, क्रमांक कोणाचा आला हे महत्ताचे नाही. ऐतिहासिक गढ-किल्ले बांधणी स्पर्धेच्या माध्यमातून मुलांनी इतिहासाची पाने चाळली, हे महत्त्वाचे. स्पर्धकांनी आमच्या या प्रयत्नांना स्पर्धेच्या दृष्टीने न बघता छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्व तरुण वर्गात पोहोचविण्याचा प्रयत्न असे समजावे. पुढील वर्षी यापेक्षा मोठ्या जोमाने स्पर्धा घेणार असल्याचे ते म्हणाले. धकाधकीच्या वातावरणात ही किल्ले स्पर्धा एक वेगळं चैतन्यच घेऊन आली. केवळ मुलेच नाही तर पूर्ण कुटुंब यात सहभागी झाल्याने त्यांच्यामध्ये सामाजिक कार्याची ओढ निर्माण होईल असा उपक्रम राबविल्याबद्दल नरेश गुजराथी, अशोक परदेशी,  संदीप देशपांडे, अनिल आव्हाड यांनी पत्रकार संघ आणि स्पर्धकांचे कौतुक केले. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण ४५ स्पर्धक या स्पर्धमध्ये सहभागी होते. विजेत्या स्पर्धकांनी बनवलेल्या गड किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले होते. स्पर्धेचे यंदाचे हे पहिले वर्ष होते. स्पर्धकांनी आपापल्या घरी किल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे परिक्षण कलाशिक्षक मिलिंद वाघ, कलाशिक्षक निलेश जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह कार्याध्यक्ष उपाली परदेशी, पाहुण्यांचे स्वागत सह सरचिटणीस अशोक बिदरी, सह संघटक गणेश केदारे, परिचय प्रसिध्दी प्रमुख नाना अहिरे, योगेश म्हस्के, तर आभारप्रदर्शन कोषाध्यक्ष निलेश वाघ यांनी केले. यावेळी रामदास सोनवणे, अनिस शेख, योगेश देशपांडे, आनंद बोथरा, राजू लहिरे, गिर्यारोहक प्रवीण व्यवहारे, प्रकाश पठाडे, राकेश कोल्हे, विशाल मोरे, पंकज वाले, अलका महाजन मॅडम, कांतीलाल येणारे, पुंडलिक कचरे, राम महाले, रेखा येणारे, सुषमा तिवारी, राजेंद्र धिंगाण ,भागीनाथ सोनार यांच्यासह स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

शालेय गट :
अमोल खरे (सकाळ) यांच्यातर्फे प्रथम पारितोषिक रोख ११००/- सन्मानचिन्ह वैभव अहिरे (शिवनेरी), अशोक परदेशी (पत्रीसरकार) यांच्यातर्फे द्वितीय पारितोषिक रोख ७००/- सन्मानचिन्ह जागृती देवरे (सिंहगड), निलेश वाघ (झी २४ तास) यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक रोख ५००/- सन्मानचिन्ह प्रांजळ रसाळ (पद्मदुर्ग),
खुला गट :
तुषार गोयल (मनमाड ठिणगी) यांच्यातर्फे प्रथम पारितोषिक रोख ११००/- सन्मानचिन्ह अजय पल्लेरवार (तोरणा), अशोक बिदरी (लोकमत) यांच्यातर्फे द्वितीय पारितोषिक रोख ७००/- सन्मानचिन्ह अनिल पगारे (रायगड), योगेश म्हस्के (छायावृत) यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक रोख ५००/- सन्मानचिन्ह सई भागवत (सुवर्णदुर्ग),
उत्तेजनार्थ :
नाना अहिरे (आवाज एन न्युज मराठी)  यांच्यातर्फे उत्तेजनार्थ पारितोषिक रोख २००/- सन्मानचिन्ह सार्थक भाबड (जंजिरा), मिलिंद वाघ (मनमाड क्रांती) यांच्यातर्फे उत्तेजनार्थ पारितोषिक रोख २००/- सन्मानचिन्ह कार्तिकी गवळी (पद्मदुर्ग), नैवेद्या बिदरी (भ्रमर) यांच्यातर्फे उत्तेजनार्थ पारितोषिक रोख २००/- सन्मानचिन्ह संघर्ष साळवे (शिवनेरी)


अजून बातम्या वाचा..

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.