loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – बळीराजाच्या प्रश्नांवर महविकास आघाडीच्या पाच आमदारांनी केले आंदोलन

Feb 27, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव बाजार समितीच्या समोर महाविकास आघाडीच्या पाच माजी आमदाराच्या नेतृत्वाखाली कांदा पिकांला हमीभाव , नांदगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे गाड्यांचे थांबे पुर्ववत बेरोजगारांच्या समस्या यासह विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीने आज सोमवारी येथील बाजार समितीच्या  रस्त्यावरील प्रवेशद्वारा समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले..

महाविकास आघाडी चे वतीने माजी आ.जगन्नाथ धात्रक,माजी आ. राजेंद्र देशमुख, माजी आ. अँड.अनिल आहेर,माजी आ.संजय पवार,माजी आ. पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तब्बल दोन तास येवला रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वार समोर रास्ता रोको आंदोलन केले.आंदोलन सुरू असताना येवलारोडवर दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या..यावेळी नायब तहसीलदार चेतन कोनकर यांना निवेदन देण्यात आले.. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कांद्याला शेतकऱ्यास एक हजार रुपये प्रती क्विंटलचे अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांनाविम्याची नुकसान पोटी विमा रक्कम मिळावे,नांदगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे गाड्यांचे पूर्ववत थांबे करावे, शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, शेतकऱ्यांच्या सक्तीचे वीज पंपाचे कनेक्शन तोडणी बंद करावे आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील,उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तालुकाप्रमुख संतोष गुप्ता,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे,राष्ट्रवादी शहराध्यक्ष अरुण पाटील, संतोष बळीद, विनोद शेलार, काका सोळसे, मुंकूंद खैरणार ‘ भरत जाधव ‘ दिपक खैरणार .शिवसेना शहराध्यक्ष श्रावण आढाव, दत्तात्रय पवार,राजु लाठे,उदय पवार,आनंद बोथरा,फैजल शेख,प्रकाश शेळके,योगिता पाटील,सिमा राजुळे,अलका आयनोर ‘ चंद्रकला बोरसे यांचासह शेकडो शेतकरी तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना,राष्ट्रवादीकॉग्रेस , काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..

 

 

 

 


अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.