Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सर्व सामान्यांना होळी पूर्वीच महागाईचा चटका – घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागले

Mar 1, 2023

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.
14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.
8 महिन्यांनंतर घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या असून यापूर्वी 1 जुलै रोजी घरगुती सिलेंडरच्या किमतींत वाढ झाली होती. त्यामुळे गेल्या वेळी जुलैमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र स्थिर होत्या. आज घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलेंडर्सच्या दरांत वाढ करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

निष्ठावंत भाजपा पदाधिकारी नीळकंठ त्रिभुवन यांचे कन्येच्या विवाह प्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ सौ भारतीताई पवार यांची उपस्थिती

मनमाड शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विश्व हिंदू परिषद ओम मित्र मंडळ आणि नंतर भारतीय जनता पार्टी...

read more
मनसेने च्या राज्यस्तरीय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात संपन्न

मनसेने च्या राज्यस्तरीय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात संपन्न

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यस्तरीय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज मुंबईतील वांद्रे येथील...

read more
परशुराम प्रतिष्ठान व सावरकर प्रेमी जनतेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

परशुराम प्रतिष्ठान व सावरकर प्रेमी जनतेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

शनिवार दिनांक २८ मे २०२२ रोजी मनमाड शहरातील चिंतामणी मंगल कार्यालय येथे श्री परशुराम प्रतिष्ठान...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]